Tarun Bharat

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते; SIT चा मोठा खुलासा

ऑनलाईन टीम / मुंबई :

कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. परंतू या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीने एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या अहवालात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. क्रूझवरील कारवाईवेळी आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते. तसेच त्याचा कोणत्याही मोठय़ा ड्रग्ज रॅकेटशी संबंध नसल्याचे एसआयटीने म्हटले आहे.

कार्डेलियावरील पार्टीत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आर्यन खानवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला याप्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप झाल्यानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली होती. तसेच समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

दरम्यान, आर्यन खानकडे कारवाईवेळी कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचे एसआयटीने म्हटले आहे. आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅटस का तपासण्यात आले? तसेच कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले नव्हते. गुन्ह्यात अटक केलेल्या इतर आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले असल्याचे एसआटीने म्हटले आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Stories

इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

Archana Banage

मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर एवढं घडलं नसतं – संभाजीराजे छत्रपती

Archana Banage

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार पार

Tousif Mujawar

सारी व कोविडबाधित ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू

Archana Banage

वानखेडेंना दिलासा; 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

datta jadhav

राज्यात लम्पी आजाराचे थैमान; अजित पवार म्हणतात;…दुर्लक्ष केल्यास राज्याला परवडणार नाही

Archana Banage
error: Content is protected !!