Tarun Bharat

आर्यन खानच्या जामिनासाठी भाजप आमदाराची प्रार्थना

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात 3 ऑक्टोबरपासून अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी आर्यन खानच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे.

राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही. अखंड मानव जातीची ड्रग्ज विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती की, महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफियाच्या विरोधात उभे राहतील. मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. मेहबूबा मुफ्ती यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी याचा पुरेपुर उपयोग केला. जी ड्रग्जची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करु शकते, त्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र का येऊ शकत नाही. हे दु:ख आहे.

आता बदलत्या भारतात कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्जचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्जच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्जपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असे राम कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार : राजेश टोपे

Tousif Mujawar

अल्पवयीन युवतीच्या विनयभंगप्रकरणात चार जणांवर पोक्सो

Patil_p

… नाहीतर बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी

Tousif Mujawar

जनसुराज्य शक्तीपक्षाच्या सरचिटणीस, प्रवक्तेपदी अॅड. राजेद्र पाटील यांची निवड

Archana Banage

शिंदे- फडणवीस सरकारवर अजित पवारांचे टिकास्त्र; म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाण…

Archana Banage

सांगलीत शामरावनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई

Abhijeet Khandekar