Tarun Bharat

आर्यन खानला एनडीपीएस न्यायालयाकडून जामीन नाहीच

मुंबई/प्रतिनिधी

शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर आज न्यायालय निर्णय देण्यात आला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत.

Related Stories

जुलै महिन्यात १ लाख कोटी पेक्षा जास्त जीएसटी जमा

Archana Banage

महाराष्ट्रात 5,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Tousif Mujawar

वाकुर्डे योजनेची स्वप्नपूर्ती…शेतकऱ्यांचा आनंदोत्सव

Archana Banage

उरमोडी आवर्तनाचे पाणी पोहचले खटावमध्ये

Archana Banage

‘इथेनॉल’बाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलून मार्ग काढू

Archana Banage

आता वादळवारे…

datta jadhav