Tarun Bharat

आर्यन खान २६ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची २६ दिवसांनंतर आज सुटका झाली. अखेर आर्यनखान आर्थर रोड तुरुंगातून मन्नतकडे रवाना झाला आहे. दरम्यान, न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता.

आर्यन खानसह अन्य दोन आरोपींचा जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी आर्यनची सुटका झाली. जामीन आदेशाची प्रत एनडीपीएस न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात पोहोचली. शनिवारी सकाळी त्याच्या सुटकेची कागदपत्रे जामीन पत्राच्या पेटीत टाकण्यात आली. आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यानंतर शुक्रवारी सत्र न्यायालयात जामीनपत्र भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली. मात्र, जामिनाची कागदपत्रे मुंबई आर्थर रोड कारागृहातील जामीन पेटीत वेळेवर जमा होऊ शकली नाहीत. त्यामुळे आर्यनची सुटका शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज सकाळी त्याची सुटका झाली.

दरम्यान, सुटकेसाठी सुटकेच्या आदेशाची हार्ड कॉपी जेलच्या जामीन पेटीत जमा केली. आर्यन खानच्या रिलीझ ऑर्डरची शुक्रवारी संध्याकाळी ५:३५ पर्यंत वाट पाहण्यात आली, पण तो येऊ शकला नाही. त्यामुळे त्याला शनिवारी सोडण्यात येणार असल्याचे निश्चित झाले, अशी माहिती आर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली होती.

शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर जामीन पेटी उघडली. काल आर्यन खानच्या जामीन सुटण्याच्या आदेशाची प्रतदेखील जामीन पेटीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून आज सकाळी १० वाजता सुटका होण्याची शक्यता होती मात्र ११ वाजता त्याची सुटका झाली. त्यांनतर तो थेट मन्नतकडे रवाना झाला.

Related Stories

खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Archana Banage

लाल महाल चित्रीकरणाप्रकरणी वैष्णवी पाटीलचा माफीनामा

datta jadhav

Sangli; आटपाडीत तीन घरफोड्या

Kalyani Amanagi

शिक्षक बँकेसह जिह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

Patil_p

कोरोनाच्या उपाययोजनेसाठी विठोबा धावला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटीची मदत

Archana Banage

अंबेच्या जागरास जिह्यात प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!