Tarun Bharat

आर्वीमध्ये बायोगॅस टाकीत आढळल्या भ्रूणांच्या कवट्या

अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांची कारवाई

नागपूर / प्रतिनिधी

नागपूरमध्ये भ्रुणह्त्येचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी महिला डॉक्टरच्या अटकेनंतर हे प्रकरण उजेडात आलं. संबंधित रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीमध्ये भ्रूणांच्या ११ कवट्या व ५४ मांसाचे तुकडे सापडले असून डॉक्टर महिलेस मदत करणाऱ्या दोन परिचारिकांसह एकूण ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आर्वी शहरात बसस्थानकाजवळ कदम रुग्णालय असून गर्भवती चे अवैधरीत्या गर्भपात केले जात होते. एका अल्पवयीन मुलीच्या आईकडून आपल्या मुलीचा गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याची तक्रार ९ जानेवारी रोजी पोलिसांत नोंदवली. तक्रार दाखल झाल्यानंतर डॉ. रेखा कदम यांच्यासह अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक करण्यात येऊन रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारात तपास सुरू केला असता अवैध गर्भपात कलेली संख्या मोठी असल्याचे दिसून आले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत होळकर यांच्याकडे केली आहे. आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर असन भ्रूणहत्येचे हे मोठे रॅकेट असावे, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात नवीन सोळा रुग्ण वाढले , पंधरा जण कोरोनामुक्त

Archana Banage

ठाण्यात उध्दव ठाकरेंना धक्का; 66 नगरसेवक शिंदे गटात

Abhijeet Khandekar

अनलॉक 2 : उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रिपोर्ट निगेटीव्ह असलेल्या पर्यटकांना फिरण्यास परवानगी

Tousif Mujawar

जिह्यातील दोन टोळ्यातील सहाजण तडीपार

Patil_p

आरोग्य सेतू ऍप सुरक्षितच

Patil_p

…तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती- संजय राऊत

Archana Banage