Tarun Bharat

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

मुंबई

 येणाऱया काळात आर्सेलर मित्तल कंपनी ओरिसामध्ये दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती ग्रुपचे चेअरमन लक्ष्मी निवास मित्तल यांनी दिली. लक्ष्मी निवास मित्तल यांनी या संदर्भात ओरिसाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. जागतिक स्तरावर सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी म्हणून आर्सेलर मित्तल ग्रुपचा उल्लेख होतो. येत्या काळात ओरिसात सुमारे दोन हजार कोटी रुपये गुंतवले जाणार असून यासाठी येथील प्रशासनाचे, लोकांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. गुंतवणूकीद्वारे उत्पादनाचा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे समजते.

Related Stories

शापित भाग्यविधाता!

Patil_p

मान्सून प्रवास मंदावलाय?

Patil_p

सुसंस्कृत ‘असामी’

Patil_p

माझ्या भक्तांना केवळ माझ्या आत्मस्वरूपाची आस असत

Patil_p

काँग्रेस : नवा गडी, नवे राज्य

Amit Kulkarni

सर्व विकारांचे कारण अविद्या

Patil_p