Tarun Bharat

आर.वैशाली, गोम्सला सुवर्ण

ऑनलाईन बुद्धिबळ : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ चेन्नई

अग्रमानांकित भारतीय महिला बुद्धिबळ संघाने आशियाई नेशन्स ऑनलाईन चषक 2020 बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे तर पुरुष संघानेही मंगोलियाचा कडवा प्रतिकार मोडून काढत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे. महिलांच्या वैयक्तिक विभागात आर. वैशाली व मेरी ऍन गोम्स यांनी सुवर्ण पटकावले.

महिला ग्रँडमास्टर आर. वैशाली या स्पर्धेत जबदरस्त फॉर्ममध्ये असून अव्वल पटावर तिने 9 फेऱयांत 6.5 गुण घेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळविले. भारतीय महिला संघाची कर्णधार मेरी ऍन गोम्सनेही पाचव्या पटावर 5 गुण घेत सुवर्ण आणि पद्मिनी राऊतने तिसऱया पटावर 7.5 गुण घेत रौप्यपदक पटकावले. पुरुषामध्ये अनुभवी के. शशीकिरणने 9 फेऱयांत 8 गुण घेत रौप्यपदक मिळविले.

भारताच्या महिला बुद्धिबळ संघाने किर्गिजस्तानचा दोन लढतीत 4-0 व 3.5-0.5 असा एकतर्फी पराभव केला. प्राथमिक फेरीत भारतानेच पहिले स्थान मिळविले होते, त्यात आर. वैशालीची कामगिरी मोलाची ठरली. त्यांची उपांत्य लढत शनिवारी मंगोलियाविरुद्ध होणार आहे. पुरुष संघाला मात्र मंगोलिया संघाकडून कडवा प्रतिकार झाला. पण त्यांनी 2.5-1.5 याच फरकाने दोन्ही लढतीत विजय मिळविले. इराणविरुद्ध शनिवारी त्यांची उपांत्य लढत होणार आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलिया-अफगाण कसोटी लांबणीवर

Patil_p

सिंधुचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p

हैदराबाद संघाचे लक्ष चौथ्या विजयावर

Patil_p

दीपक चहर आयपीएलमधून बाहेर

Patil_p

ग्रीक चषक फुटबॉल अंतिम सामना लांबणीवर

Patil_p

पाकला विजयासाठी 319 धावांचे आव्हान

Amit Kulkarni