Tarun Bharat

आर.व्ही.देशपांडे यांच्याकडून प्रचाराचा धडाका

शहापूर, वडगावसह ग्रामीण भागात मतदारांशी संवाद : काँग्रेसला निवडून देण्याचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

माजी मंत्री व विद्यमान आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. भर उन्हात विविध ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेऊन काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी जनतेनेही महागाईमुळे आम्ही त्रस्त झालो असून भाजपला दणका देऊ, असे आश्वासन दिले.

माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांचे बालपण आणि शिक्षण बेळगावमध्येच झाले. त्यामुळे येथील अनेक मित्रमंडळी तसेच विविध समाजांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी उघडली आहे. कम्युनिस्ट, भोवी समाज, विणकर समाज, सुवर्णकार समाज यासह इतर समाजातील नेते मंडळींशी थेट भेट घेऊन त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

भाजपने सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे. महागाईमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले आहे. याचबरोबर जीएसटीसारखा कर लादून केंद्र सरकारने सर्वसामान्य आणि उद्योजकांना जेरीस आणले आहे. त्यामुळे आता त्यांना धडा शिकविण्याची हीच वेळ असून एकजुटीने काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना मतदान करा आणि त्यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वडगाव, तेग्गीन गल्ली येथील भोवी समाजाने त्यांचे स्वागत केले. आम्ही काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे राहू, असे ठोस आश्वासन दिले आहे. याचबरोबर लक्ष्मीनगर वडगाव, नार्वेकर गल्ली, शहापूर येथील सुवर्णकार समाज येथेही जाऊन भेट घेतली. त्यांनाही केंद्र सरकारने कशा प्रकारे अन्याय केला आहे, महागाईचा भडका उडण्यामागे कोणती कारणे आहेत, याची माहिती आर. व्ही. देशपांडे यांनी दिली आहे.

विणकर समाजातील नेते मंडळींचीही त्यांनी भेट घेतली. त्या ठिकाणी मोठी सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विणकर समाजाला त्यांनी आवाहन केले आहे. विणकर समाजानेही त्यांचे स्वागत करत आम्ही काँग्रेसच्या पाठिशी असल्याचे सांगितले. भर उन्हात आर. व्ही. देशपांडे यांनी विविध ठिकाणी गाठीभेटी घेण्यासाठी धडपड केली. कोणत्याही परिस्थितीत सतीश जारकीहोळी यांना विजयी करायचे आहे असे सांगत तुमची साथ आम्हाला हवी आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना
केले.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, जयराज हलगेकर, अनिल पोतदार, किरण पाटील, परशराम ढगे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

पोलीस, पत्रकार असल्याचे सांगून पाच लाखांची लूट

Patil_p

कोरोनाविरोधात अधिकारीवर्ग उतरला मैदानात

Amit Kulkarni

रेशनचा तांदूळसाठा नेसरगीजवळ जप्त

Omkar B

आज दिवसभर राहणार लॉकडाऊन

Patil_p

सामाजिक भान बाळगल्यास परिवर्तन शक्य

Amit Kulkarni

उद्याच्या चाबूक मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हा!

Patil_p