अभिनेत्री अलाया एफने ‘जवानी जानेमन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अलायाला ही पूजा बेदीची मुलगी. ‘जवानी जानेमन’ला चांगलं यश मिळालं. त्यामुळे अलाया खूप खूश आहे. अलायाला या चित्रपटात वेगळ्या प्रकारची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या यशापयशाचा विचार करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला आपल्याला देण्यात आला होता, असं अलाया सांगते. इतकंच नाही तर सगळ्यांशी चांगलं वागण्याबद्दलही तिला सांगण्यात आलं होतं. मनोरंजनाच्या क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला बरंच काही शिकायला मिळत असल्याचं तिचं म्हणणं आहे.


previous post