Tarun Bharat

आवाडे, चराटी, पेरीडकर पराभूत

अप्पी पाटील यांनाही दणका, जिल्हा बँकेच्या चाव्या सत्ताधाऱ्यांकडेच, 12 जुने तर 9 नविन चेहरे, शिवसेनेची कडवी झुंज

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी आघाडाली पुन्हा एकदा साथ दिली आहे. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत इतर गटातील 9 पैकी 6 सत्ताधाऱयांना मिळाल्या तर 3 जागांवर शिवसेना प्रणित परिवर्तन आघाडीचा झेंड फडकला. तर अशोक चराटी, सर्जेराव पाटील पेरीडकर आणि विनायक पाटील यांनी मतदारांनी घरी बसवले. शाहूवाडीतून रणवीर गायकवाड यांनी संस्था गटातून सेनेच्या पाठिंब्यावर बाजी मारली. उर्वरित पाच जागा सत्ताधारी आघाडीच्या मानल्या जात आहेत, एकंदरीत जिल्हा बँकेच्या चाव्या पुन्हा एकादा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांच्याकडेच राहणार हे सष्ट झाले आहे. या निवडणुकीत मतदारांनी 12 जुन्या तर 9 नविन चेहऱयांना सधी दिली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करीत जलोष साजरा केला.

सकाळी आठ वाजता बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला पा†हल्यांदा सर्व मतपत्रिका एकत्रित करुन गठ्ठे करण्यात आले. त्यानंतर संस्था गटातील मतमोजणी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता आजरा संस्था गटाचा धक्कादायक निकाल लागला. येथून सत्ताधारी आघाडीचे सुधीर देसाई 57 मध्ये घेत विजयी झाले त्यांनी विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा पराभव केला त्यांना 48 मते मिळाली. भुदरगड मधून माजी आमदार कें पी. पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील गडिंग्लज मधून विद्यमान संचालक संतोष पाटील विजय झाले. गडहिंग्लजमध्ये माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांचा नामुष्कीजनक पराभव झाला त्यांना केवळ 5 मते मळाली.

शाहूवाडीत सावकरांना धक्का , यड्रावकरांची बाजी
जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या शिरोळ तालुक्यात पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी 98 मते घेत विजय दुसऱयांदा जिल्हा एन्ट्री केली. येथे गणपतराव पाटील यांना 51 मते मिळाली. मंत्री पाटील यांच्या विरोधात शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्व विरोधी गट एकत्र आले होते. माजी खासदार राजू शेट्टी हे गणपतराव पाटील यांचे मतदान प्रतिनिधी होते. गणपतराव पाटील यांना शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांनी पाठिंबा दिला होता. असाच धक्कादायक निकाल शाहूवाडी मतदारसंघात लागला शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी पाठिंबा दिलेले रणवीर गायकवाड 66 मते घेत विजयी झाले. येथे विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना यांचा पराभव धक्का बसला. पेरीडकर यांचा पराभव कोरे यांना जिव्हारी लागणारा आहे. सत्ताधारी आघाडीने पेरीडकर आणि गायवाड दोन्ही उमेदवार आपलेच आसल्याचा दावा केला होता. पन्हाळ्य़ातून अपेक्षेप्रमाणे आमदार विनय कोरे 204 मध्ये घेत विजयी झाले.

पतसंस्था, प्रक्रियामध्ये सत्ताधाऱयांना धोबीपछाड
सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रक्रिया गटात सत्ताधारी आघाडीत जबरदस्त धक्का बसला येथे शिवसेना प्रणित परिवर्तन आघाडीचे नेते खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील असुर्लेकर मोठ्य़ा फरकाने विजयी होत सत्ताधारी आघाडीला धोबीपछाड दिला. सत्तारुढ आघाडीचे उमेदवार मदन कारंडे, प्रदीप दादासाहेब पाटील भुयेकर यांचा पराभव केला. त्यापाठोपाठ पतसंस्था गटातील सत्ताधारी गटाला पराभव चाखावा लागला. येथे आमदार प्रकाश आवाडे यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला. आमदार प्रकाश आबीटकर यांचे बंधून अर्जुन अबीटकर यांनी आवाडे यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला. येथून मात्र पुढील सर्व जागा ताब्यात ठेवण्यात सत्ताधारी गटास यश आले. इतर संस्था गटातून प्रताप माने, ओबीसी गटातून विजयसिंह माने, भटक्या जमाती गटातून स्मिता गवळी, अनुसुचित जाती गटातून आमदार राजू आवळे मोठय़ा फरकाने विजयी झाले.

महिला गटातून निवेदिता माने, श्रृतिका काटकर यांना संधी
मा†हला गटातील सत्ताधारी आघाडीच्या उमेदवार व विद्यमान संचालक श्रीमती निवेदिता माने, श्रृतिका काटकर या विजयी झाल्या. त्यांनी या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे महिला गटातील उमेदवार रेखा सुरेश कुराडे, लतिका पांडूरंग शिंदे यांचा पराभव केला. बँकेच्या निवडणुकीत यंदा शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल केले होते. दरम्यान या निवडणुकीत श्रीमती निवेदिता माने या सत्ताधारी आघाडीच्या उमेदवार होत्या. दुसरीकडे बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांना यंदा उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी ला†तका शिंदे या विरोधी परिवर्तन आघाडीच्या उमेदवार होत्या.

क्रांतिसिंह पवार, रवींद्र मडके पराभूत
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवडणुकीत इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून विद्यमान संचालक व सत्ताधारी आघाडीचे उमेदवार भैय्या माने व इतर मागासवर्गीय गटातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विजयसिंह अशोकराव माने विजयी ठरले. भैय्या माने यांनी इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून पा†रवर्तन विकास आघाडीचे उमेदवार क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील यांचा पराभव केला. इतर मागासवर्गीय गटातून रवींद्र बाजीराव मडके यांना पराभव सहन करावा लागला.

तीन विद्यामना परभूत
अशोक चराटी, सर्जेराव पाटील पेरीडकर, अप्पी पाटील हे तीन विद्यामान संचालकांना पराभवाची झळ बसली तर विद्यामान संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नीही पराभूत झाल्या. त्यांनी परिवर्तन आघाडीकडून निवडणूक लढवली होती.

पक्षिय बलाबल असे:
राष्ट्रवादी-7
शिवसेना-6
काँग्रेस-5
जनसुराज्य-2

भाजप-1

बाŸक्स पान 1 साठी
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी
संस्था गट-
आजरा-
सुधीर राजाराम देसाई-57 (विजयी)
अशोक काशिनाथ चराटी-48 (पराभूत)
भुदरगड
रणजीतसिंह कृष्णराव पाटील-144 (विजयी)
यशवंत केरबा नांदेकर- 62 (पराभूत)
गडहिंग्लज
संतोष तात्यासो पाटील-100 (विजयी)
अफ्पी विरगोंडराव पाटील 6 (पराभूत)
पन्हाळा
विनय विलासराव कोरे-204 (विजयी)
विजयसिंह यशवंतराव पाटील-38 (पराभूत)
शाहूवाडी
रणवीर मानसिंगराव गायकवाड-66 (विजयी)
सर्जेराव बंडू पाटील-पेरीडकर- 33 (पराभूत)
शिरोळ
राजेंद्र पाटील-यड्रावकर-98 (विजयी)

गणपतराव आफ्पासो पाटल 51 (पराभूत)

प्रक्रिया गट
संजय सदाशिवराव मंडलिक-306 (विजयी)
बाबासाहेब पंडीतराव पाटील- असुर्लेकर 329(विजयी)
प्रदीप दादासो पाटील- भुयेकर 119 (पराभूत)

मदन सिताराम कारंडे 122 (पराभूत)

बँका, पतसंस्था गट
अर्जुन आनंदराव आबीटकर-613 (विजयी)
प्रकाश कल्लाफ्पा आवाडे 463 (पराभूत)
अनिल आपगोंडा पाटील 107 (पराभूत)

विकास धनपाल मोर्चे 1 (पराभूत)

इतर शेती संस्था व्यक्ती गट
प्रताप यशवंतराव माने 2266 (विजयी)

क्रांतीसिंह संपतराव पवार-पाटील 1655(पराभूत)

महिला राखीव
निवेदिता संभाजीराव माने 4149 (विजयी)
श्रृतिका शाहू काटकर 4575 (विजयी)
रेखा सुरेश कुऱहाडे 2079 (पराभूत)

लतिका पांडुरंग शिंदे 2966 (पराभूत)

इतर मागासवर्गीय
विजयसिंह अशोकराव माने 4631 (विजयी)

रविंद्र बाजीराव मडके 2750 (पराभूत)

अनुसुचित जाती
राजूबाबा जयवंतराव आवळे 5002(विजयी)

उत्तम रामचंद्र कांबळे 2373(पराभूत)

विमुक्त जाती भटक्या जमाती
स्मिता युवराज गवळी 4887 (विजयी)
विश्वास शंकरराव जाधव 2495(पराभूत)

Related Stories

‘इंडिगो’ नाही ‘स्टार एअर’चीच विमानसेवा

Archana Banage

धामोड कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २९ जण निगेटिव्ह

Archana Banage

आज कोल्हापूर बंद, सकाळी महामार्ग रोखणार

Archana Banage

Special News : एजीवडेतील पुनर्वसीत कुटुंबाला अखेर न्याय,तरुण भारतच्या वृतांची दखल

Archana Banage

जे.एन.यू. प्रकरण : त्या हल्लेखोरांना त्वरीत अटक करा

Archana Banage

शिरोळ तालुक्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही – सकल मराठा समाज

Archana Banage
error: Content is protected !!