Tarun Bharat

आशा वर्कर्सचा 8 रोजी मोर्चा

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने बुधवार 8 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये अनेक कामगार संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य सीटू संघटनेच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.

 कामगारांच्या रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या आदेशानुसार सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स राज्य कमिटीच्या निर्णयानुसार जिल्हास्तवर आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्या मांडण्यासाठी ओरोस तिठा येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला जाणार आहे.

या मोर्चामध्ये आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, जनवादी महिला संघटना, माईन्स वर्कर्स युनियन सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Related Stories

आचरा ग्रामपंचायत कडून बचतगटाला मोफत हळदीचे वाटप

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्गचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश करा – नीतेश राणे

NIKHIL_N

शिंदे गटातर्फे आडेली गावातील रस्त्याची साफसफाई

Anuja Kudatarkar

मराठा समाजाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

Anuja Kudatarkar

वेंगुर्ले शहरातील गटारे तात्काळ साफ करा

NIKHIL_N

विठ्ठला…देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होऊ दे!

Anuja Kudatarkar