Tarun Bharat

आशा स्वयंसेविकेला अपमानास्पद वागणूक

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर जिल्हय़ातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य कर्मचाऱयांमार्फत सर्व्हेक्षण केले जात आहे. मात्र जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱया या सर्वेक्षणात काही व्यक्ती अडसर निर्माण करीत आहेत. असाच एक प्रकार एका आशा स्वयंसेविकेबाबत घडला आहे. जिल्हा परिषद वसाहतीमधील एका शासकीय कर्मचाऱयाकडून आशा कर्मचाऱयाला अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. याबाबत संबंधित आशा स्वयंसेविकेने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहे.

आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक घरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती तसेच त्यांच्या प्रवासाची माहिती घेतली जात आहे. यात कोणाला खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आहे का?, बाहेरील जिल्हय़ातून आलेल्या व्यक्ती याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. तर नगर पालिका क्षेत्रामध्ये नगर पालिका प्रशासनातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाला जिल्हावासीय जनतेकडून चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र काहीजण ही माहिती देताना अडचणी निर्माण करीत आहेत. असाच एक प्रकार सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद वसाहतीमध्ये घडला आहे. जि. प. वसाहतीमध्ये सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलेल्या आशा कर्मचाऱयाला एका शासकीय कर्मचाऱयाकडूनच अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

Related Stories

शिरोडा-वेळागर येथे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आ. केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

Anuja Kudatarkar

आचरा ग्रामपंचायत तर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा गौरव

Anuja Kudatarkar

हत्ती समस्येला देणार पूर्णविराम!

NIKHIL_N

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Abhijeet Khandekar

कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू

NIKHIL_N

‘तौक्ते’ग्रस्तांना मदत हवीच, पण पुढील खबरदारीचे काय?

NIKHIL_N