Tarun Bharat

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा लांबणीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना महामारी समस्येमुळे आशियाई चॅम्पियन्स करंडक पुरूष आणि महिलांची हॉकी स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय आशियाई हॉकी फेडरेशनने शुक्रवारी जाहीर केला आहे. आता सदर स्पर्धा चालू वर्षांच्या उत्तरार्धात घेण्यात येणार आहे.

आशियाई चॅम्पियन्स करंडक पुरूष आणि महिलांची हॉकी स्पर्धा यापूर्वी गेल्यावर्षी घेण्याचे निश्चित केले होते. सदर स्पर्धा कोरोना महामारीमुळे पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी पुरूषांची चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा ढाक्का येथे 11 ते 19 मार्च दरम्यान तर महिलांची चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा दक्षिण कोरियात 31 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार होती.

आशिया खंडामध्ये कोरोनाची स्थिती सुधारली असली तरी अद्याप आणखी काही कोरोना बाधित रूग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य आम्ही देत असल्याने सदर स्पर्धा आता 2021 च्या उत्तरार्धात घेण्याचा विचार चालू आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने या निर्णयाला अधिकृत मान्यता दिली आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या स्पर्धा घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Stories

टोकियो ऑलिंपिकमध्ये अशोककुमार एकमेव भारतीय कुस्ती पंच

Patil_p

अशोक दिंडा गोवा संघातून खेळणार

Patil_p

युक्रेनला हरवित अमेरिका अंतिम फेरीत

Patil_p

अबिद, अझहरची शतके

Patil_p

कर्णधार विल्यम्सन चौथ्यांदा सर हॅडली पुरस्काराचा मानकरी

Patil_p

केएल राहुलला 24 लाखांचा दंड

Patil_p