Tarun Bharat

आशियातील दानशूरांमध्ये तीन भारतीय

फोर्ब्सच्या यादीत अदानी अव्वल ः यासह नाडर व अशोक सुता यांचाही समावेश

नवी दिल्ली

  नुकतीच फोर्ब्सने आशियातील सर्वात दानशूर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतामधील गौतम अदानी, शिव नाडर आणि अशोक सुता यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय मलेशियन-भारतीय उद्योगपती ब्रह्मल वासुदेवन आणि त्यांची वकील पत्नी शांती कंडिया यांचाही या यादीत समावेश आहे. ते भारत आणि मलेशियामध्ये समाजसेवेकरीता आपले योगदान खर्चाच्या माध्यमातून देत आहेत.

अदानींनी केला 60 हजार कोटींचा खर्च 

अदानी हे सध्या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख आहेत. यावर्षी जूनमध्ये 60 वर्षांचे झाल्यावर त्यांनी 60 हजार कोटी रुपये सामाजिक कार्यावर खर्च करणार असल्याचे सांगितले होते. त्यांचा पैसा आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासावर खर्च होत असल्याचा दावा अदानींनी केला आहे.

शिव नाडर ः यावर्षी 11,600 कोटी रुपये धर्मादाय 

एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक-अध्यक्ष शिव नाडर आणि कुटुंब या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि शिव नाडर फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

अशोक सूता ः संशोधनासाठी दिले 600 कोटी रुपये

अशोक सूता यांच्या मते एखादी कंपनी सार्वजनिक झाल्यावर कॉर्पोरेट गव्हर्नन्स सुधारण्यासाठी दबाव येतो. अध्यक्ष अशोक सूता (80) यांनी वैद्यकीय संशोधनासाठी ट्रस्टला 600 कोटी रुपयांची देणगी दिली. 2021 मध्ये त्यांनी हा ट्रस्ट तयार केला आहे. अशोक सूता हे हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

अंबानींची रिलायन्स 20व्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सच्या ‘वर्ल्ड्स बेस्ट एम्प्लॉयर्स-2022’ यादीत सॅमसंग पहिल्या क्रमांकावर  आहे. फोर्ब्सने अलीकडेच ‘वर्ल्ड्स बेस्ट एम्प्लॉयर्स 2022’ ची क्रमवारी (सूची) जारी केली. यात   रिलायन्स इंडस्ट्रीज महसूल, नफा व मूल्याच्या बाबतीत 20 व्या क्रमांकावर आहे.

Related Stories

बाजारातील सलगच्या तेजीला अखेर विराम!

Patil_p

रिटेल क्षेत्राची विक्री कोविडपूर्वपेक्षा अधिक

Patil_p

युनिकॉर्न स्टार्टअप लिशियसने 15 कोटी डॉलर्स उभारले

Patil_p

टेस्लाच्या एलॉन मस्कना मोठा झटका

Patil_p

अंबुजा सिमेंट्चा तिमाही नफा वधारला

Patil_p

स्टेट बँकेच्या समभागाचा 17 टक्के परतावा

Amit Kulkarni