Tarun Bharat

आशिया चषक टी-20 स्पर्धा जून 2021 मध्ये घेण्याचा विचार

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोना महामारी संकटामुळे लांबणीवर टाकण्यात आलेली आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा आता जून 2021 साली लंकेत आयोजित करण्याचा विचार आशियाई क्रिकेट कौन्सिलने सुरू केला आहे. या स्पर्धेच्या कार्यक्रमात फेरबदल करण्यासाठी आशियाई क्रिकेट मंडळाने कामाला सुरुवात केली आहे.

यापूर्वी सदर स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये घेतली जाणार होती. या स्पर्धेचे यजमानपद पाककडे सोपविण्यात आले होते. पण ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला होता. मात्र कोरोना प्रसारामुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकली गेली. आता ही स्पर्धा जून 2021 मध्ये लंकेत आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आशियाई क्रिकेट मंडळाने दिली आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळविल्या जाणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसंदर्भात आयसीसीकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

Related Stories

इंग्लिश संघात दोन नवे चेहरे

Patil_p

लंका दौऱयाबाबत बीसीसीआयचा निर्णय घेण्यास विलंब

Patil_p

19 सप्टेंबरपासून फुटणार आयपीएलचे फटाके!

Patil_p

बांगलादेशच्या फलंदाज प्रशिक्षकपदी सिडॉन्स

Amit Kulkarni

केंट क्रिकेट क्लबचा जॅक्सन बर्डशी नवा करार

Patil_p

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे

Patil_p
error: Content is protected !!