Tarun Bharat

आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतात

नवी दिल्ली : 2022 साली होणाऱया आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे. सदर स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 साली होणार असल्याची घोषणा गुरूवारी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने केली आहे.

गेल्या स्पर्धेच्या तुलनेत 2022 च्या आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेचे विस्तारीकरण करण्यात आले असून आता या स्पर्धेत 8 ऐवजी 12 संघांचा समावेश करण्यात आला आहे. हे संघ तीन गटात विभागण्यात आले असून प्रत्येक गटात 4 संघ असतील. 18 दिवसांच्या कालावधीत या स्पर्धेत किमान 25 सामने खेळविले जातील.

Related Stories

कॅनडा डेव्हिस चषकाचा पहिल्यांदाच मानकरी

Patil_p

नेमबाजांसाठी सक्तीचे शिबिर लांबणीवर

Patil_p

पाकची झिंबाब्वेवर 88 धावांची आघाडी

Patil_p

इंडिया लिजेंड्स अंतिम फेरीत

Amit Kulkarni

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतभारताला आणखी दोन पदके

Amit Kulkarni

रोहित शर्मा, बुमराह, सुर्यकुमार अबु धाबीत दाखल

Patil_p