Tarun Bharat

आशिष कुमार उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था / अम्मान, जॉर्डन :

आशियाई रौप्यविजेत्या आशिष कुमारने (75 किलो गट) आशियाई ऑलिम्पिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याने किर्गिस्तानच्या ओमुरबेक बेकझिगिट उलूचा पराभव केला. महिलांमध्ये सिमरनजित कौर व साक्षी चौधरीने आगेकूच केली आहे.

आशिषने ओमुरबेकवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवित आगेकूच केली. त्याची पुढील लढत इंडोनेशियाच्या मैखेल रॉबर्ड मुस्किताशी होणार आहे. मुस्किताने न्यूझीलंडच्या रेयान स्काइफचा पराभव केला. पुढील लढत जिंकल्यास आशिषला ऑलिम्पिक पात्रता मिळू शकेल. ऑलिम्पिक स्पर्धा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. आशिषने गेल्या वर्षीच्या आशियाई स्पर्धेतही उलूला उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते. यावेळच्या लढतीत आशिषने वेटिंग गेम परिपूर्णतेने अमलात आणला. त्याने उलूला आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्याची संधी दिली. उलूने आशिषपेक्षा अधिक फटके मारले. मात्र आशिषनेच पहिल्या तीन मिनिटांत जास्त अचूक फटके मारले.

उलुने दुसऱया फेरीतही आशिषवर दडपण आणले आणि उजव्या हाताने काही ठोसेही मारल्याने आशिषचा तोल गेला. यामुळे या फेरीत दोघांना विभागून गुण देण्यात आले. शेवटच्या तीन मिनिटांत मात्र आशिषने उजव्या हाताने जबरदस्त आणि अचूक ठोसे लगावल्याने पंचांनी आशिषच्या बाजूने निर्णय दिला.

बुधवारी महिला बॉक्सर्स सिमरनजित कौर (60 किलो गट) व साक्षी चौधरी (57 किलो) यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सिमरनजितने कझाकच्या रिम्मा व्होलोसेन्कोचा 5-0 असा पराभव केला तर माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन साक्षी चौधरीने थायलंडची आशियाई रौप्यजेती व चौथी मानांकित निलावन तेचासुएपचा 4-1 असा पराभव केला होता.

Related Stories

‘टॉप-हेवी’ लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ‘डेंजरस’ आरसीबी

Patil_p

कोरियाची सेयुंग, चीनचा वेंग यांग विजेते

Patil_p

मुंबईच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजूमदारची निवड

Amit Kulkarni

‘खेलरत्न’ने सन्मानित, तरीही ‘अर्जुन’साठी शिफारस!

Patil_p

पोर्तुगालमधील शर्यतीत भारताचे चार सायकलपटू

Patil_p

अमेरिकेच्या ऍलिसन फेलिक्सला विक्रमी 10 वे ऑलिम्पिक पदक

Patil_p
error: Content is protected !!