Tarun Bharat

आशिष शहा यांचा ओडिशा एफसीला निरोप

Advertisements

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया ओडिशा एफसी संघाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष शहा यांनी निरोप घेण्याचे ठरविले आहे.

आशिष शहा आणि ओडिशा एफसी यांच्यात तीन वर्षांचा करार यापूर्वी करण्यात आला होता. या कराराची मुदत आता संपत आली आहे. ओडिशा एफसी संघाच्या अधिकाऱयांनी तसेच संघातील खेळाडूंनी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल शहा यांनी त्यांचे आभार मानले आहेत. भविष्यकाळामध्ये इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसी हा संघ बलवान म्हणून ओळखला जाईल, असे सांगून या संघाला सीईओ शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशा एफसी संघाचे अध्यक्ष रोहन शर्मा यांनी आशिष शहा यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Related Stories

टी-20 मध्ये पोलार्डचे पाचशे सामने, दहा हजार धावा

tarunbharat

माजी फुटबॉलपटू सेंट जॉन कालवश

Patil_p

द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी केएल राहुल उपकर्णधार

Patil_p

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

ICC-World Cup 2022-जिंकलो… टिम इंडियाने पाकिस्तानवरील विजयाने साजरी केली दिवाळी

Kalyani Amanagi

रोहित शर्मा म्हणतो, आता मी पूर्ण तंदुरुस्त!

Omkar B
error: Content is protected !!