Tarun Bharat

आश्रिता बनली पहिली महिला फ्लाईट टेस्ट इंजिनियर

सर्वच क्षेत्रांमध्ये आता महिला अहमहमिकेने पुढे सरसावताना दिसत आहेत. कर्नाटकाच्या आश्रिता व्ही. ओलेटी या युवतीने नुकताच देशाची पहिली महिला फ्लाईट टेस्ट इंजिनियर बनण्याचा मान मिळविला आहे. हा शिक्षणक्रम निवडणारी तिच्या तुकडीतील ती एकमेव महिला होती. तिने तो यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. स्क्वॉड्रन लिडर असणाऱया आश्रिताने भारतीय वायुसेनेच्या विमानचालक प्रशालेतून पदवी मिळविली आहे. फ्लाईट टेस्ट इंजिनियर ही अत्यंत जोखमीची आणि जबाबदारीची जागा असून आपण ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्वास तिने आपल्या यशानंतर व्यक्त केला आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करत असताना ती तिच्या पुरुष सहकाऱयांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नव्हती, असे तिच्या शिक्षकांनी आणि वायु दलातील ज्ये÷ अधिकाऱयांनी म्हटले आहे. हा अभ्यासक्रम 1973 मध्ये सुरू झाला. त्यानंतर आजपर्यंत गेल्या 48 वर्षांत केवळ 275 लोकांनी या अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. त्यात आश्रिता ही पहिली महिला आहे. यासाठी तिचे विशेष कौतुक होत आहे.

Related Stories

इन्स्टाग्राम युजर्सना सर्व्हर डाउनचा फटका

Patil_p

ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

Tousif Mujawar

वर्षअखेरपर्यंत आणखी एक स्वदेशी लस

Amit Kulkarni

शेतकऱयांचा 8 डिसेंबरला एकदिवसीय ‘भारत बंद’

Patil_p

राज्यात 12 जणांना कोरोनाचा संसर्ग

Patil_p

राजस्थान : पूर्ण डिसेंबर महिन्यात ‘या’ जिल्ह्यांत असणार नाईट कर्फ्यू

Tousif Mujawar