Tarun Bharat

आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी : अजित पवार

ऑनलाईन टीम / पुणे :


उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चं जाहीर केले आहे. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. 

अजित पवार म्हणाले की, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केलेली होती. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत अनेकांनी पायी वारीसाठी आग्रही मागणी केली होती. अशातच काल (गुरुवारी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • 10 पालख्यांसाठी 20 बस


या वारकाऱ्यांना मान्यता असेल परंतु पालखी घेऊन जाण्यासाठी परवानगी नसेल मंदिरात वारकाऱ्यांना जाण्याची परवानगी आहे. परंतु पायी वारी सोहळ्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. वारकाऱ्यांसाठी 10 पालखी वारीकरता प्रत्येकी 2 बस म्हणजे 20 बस उपलब्ध करुन दिल्या जातील.


10 मानाच्या पालख्या : 


श्री. संत एकनाथ महाराज संस्थान पैठण ( औरंगाबाद )

श्री. संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर (नाशिक)श्री. चांगावटेश्वर देवस्थान सासवड (पुणे)

श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड (पुणे)

श्री. संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर (जळगाव)

श्री. विठ्ठल रुक्माई सौठण्यपुर (अमरावती)

श्री. संत तुकाराम महाराज संस्थान ( पुणे)

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी

श्री. संत नामदेव महाराज संस्थान पंढरपुर (सोलापुर)

श्री. संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर ( अहमदनगर)

Related Stories

पुसेगावात दुचाकीला ट्रकची धडक; महिला ठार

Patil_p

कर्नाटक: मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये देणार : कृषी राज्यमंत्री बी. सी. पाटील

Archana Banage

“ऑपरेशन गंगा हे निव्वळ मोदी सरकारचे ढोंग ”

Abhijeet Khandekar

”अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना”

Archana Banage

कोरोनाबाबत WHO चा जगाला गंभीर इशारा !

Archana Banage

चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचार्‍यांची निदर्शने

Archana Banage