Tarun Bharat

आष्ट्यात पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला आग

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात

आष्टा / वार्ताहर

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर आष्टा पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल आणि डिझेल ची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. आष्टा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आली आणि मोठी हानी टळली. सोमवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास आष्टा ते सांगली रोडवर आष्टा पोलीस ठाण्यासमोर चालक संजय तानाजी खोत रा. विकासवाडी, ता.करवीर जि.कोल्हापुर हा हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. हजारवाडी येथुन टँकर नंबर एम.एच.०९/एम-७१७६ मधुन दहा हजार लिटर पेट्रोल, व दहा हजार लिटर डिझेल असा ज्वलनशिल माल घेऊन हजारवाडी ते कोल्हापूर असा जात असताना आष्टा पोलीस ठाणे समोर अचानक चालते वाहनात इलेक्ट्रीक शॉर्टसर्किट होऊन टँकरच्या केबीनने पेट घेतल्याने ड्रायव्हर संजय खोत याने गाडी रस्त्याकडेला थांबवुन गाडीतील डी.सी.पी.फायर सिलेंडर फोडुन आग विझवीणेचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार पाहुन आष्टा पोलीस ठाणेकडील अधिकारी पोलीस निरीक्षक अजित सिद व पोलीस कर्मचारी स.पो.फौ. संजय सनदी, अभिजित धनगर,राजेंद्र पाटील,अवधुत भाट,योगेश जाधव, नितीन पाटील,अमोल शिंदे, अभिजित नायकवडी, समद मुजावर, रावसाहेब देशिगे, सदिप बागडी, परशुराम ऐवळे, महीला पोलीस अक्काताई नलवडे, काजल जाधव अशांनी तत्परतेने फायर बिग्रेड आष्टा नगरपालिका, हुतात्मा कारखाना वाळवा, सांगली महानगरपालिका, इस्लामपूर नगरपालिका यांना माहीती देऊन सदर घटनेजवळील दुकाने, हॉटेल, चहाटपरी बंद करुन तेथील ज्वलनशिल गॅस सिलेंडर सुरक्षीत ठिकाणी हलवुन आसपास असलेल्या नागरी वस्ती, पोलीस वसाहत मधील नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलवीले. तसेच हमरस्त्यावरील दोन्ही बाजुची वाहने सुरक्षित ठिकाणावर उभी करुन बॅरेक गेटींग करण्यात आले. व पोलीस ठाणेकडील दोन डी.सी.पी. फायर सिलेंडर तसेच सदर भागात असले रत्ना बेकरीमधील एक डी.सी.पी. फायर सिलेंडर असे तिन सिलेंडर फोडुन आग विझवीणेचा प्रयत्न केला दरम्यान मुदतीत सहाय्यक पोलीस फौजदार संजय सनदी यांनी वारंवार फायर बिग्रेडशी संपर्क साधल्याने काही वेळेतच आष्टा नगरपालिका, हुतात्मा कारखाना वाळवा, सांगली महानगरपालिका, इस्लामपूर नगरपालिका कडील एकुण पाच पाण्याचे टँकर येऊन त्यांचे कर्मचारी यांनी चारही बाजुनी टँकरवर फायर फायटर मधील पाण्याचा फवारा मारुन आग अटोक्यात आणुन विझवीली.

टँकर नंबर एम.एच.०९/एम-७१७६ मध्ये दहा हजार लिटर पेट्रोल, व दहा हजार लिटर डिझेल असा एकुण वीस हजार लिटर ज्वलनशिल माल होता टँकरचे केबीन मध्ये अचानक आग लागली होती. सदरचे ठिकाण हे मुख्य रहदारीचे रहिवाशी भागात होते. जवळच महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयात शाळा सुरु होती. घटनेच्या ठिकाणाचे आसपास व्यापारी दुकाने, हॉटेल, फळ विक्रेते अशी दुकाने सुरु होती. सदर घटनेच्या ठिकाणापासुन ५०० मिटर अंतरावर शिंदे यांचा रिलायन्स पेट्रोल पंप, श्री वग्यानी यांचा हिन्दुस्थान पेट्रोलपंप, श्री रुकडे यांचा इंडियन पेट्रोलपंप असे पेट्रोलपंप होते. शेजारीच आष्टा पोलीस ठाणे इमारत होती. अशा परिस्थीती मध्ये सदर टँकर मधील लागलेली आग वेळीच अटोक्यात आणली नसती तर पेट्रोल व डिझेलचा मोठया प्रमाणात भडका होऊन भरुन न येणारी अतोनात जिवीत व मालमत्तेची हानी झाली असती पोलीसांच्या सतर्कता, धाडस व तत्परतेमुळे सदरची भयानक घटना वेळीच आटोक्यात आणणेत यश आने आहे. त्यामुळे आष्टा शहरातुन पोलीसांच्या कामगीरी बद्दल कौतुक होत आहे.

Related Stories

तालिबानला मोठा झटका, बंडखोरांनी हिसकावले दोन प्रांत

Archana Banage

Sharad Pawar: कॉंग्रेसने आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती- शरद पवार

Abhijeet Khandekar

कोरोना उपचार वस्तूंवर जीएसटी दर कपात

Archana Banage

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

Archana Banage

सांगली : कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या गावात निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे : पालकमंत्री

Archana Banage

बंगाल हिंदुस्थानला पाकिस्तान किंवा तालिबान होऊ देणार नाही – ममता बॅनर्जी

Archana Banage