Tarun Bharat

आसगाव येथे अज्ञाताकडून साईबाबांच्या घुमटीची मोडतोड

वार्ताहर / म्हापसा

मुणालवाडो आसगाव बार्देश येथे काही विघ्न संतोषी लोकांकडून साईबाबांच्या लहान मूर्चीची मोडतोड केली असून यामुळे स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या आहे. ग्रामस्थांकडून याविषयी कारवाई होण्यासाठी अज्ञातांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात आली आहे.

रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. रविवारी या ठिकाणी जत्रोत्सव होतो. त्यामुळे सुहासिनी महिला याठिकाणी दिवजोत्सव घेऊन आल्या होत्या. जत्रोत्सवाचा उत्सव संपल्यानंतर मध्यरात्री हा मोडतोड प्रकार घडला आहे. या सर्व प्रकरणामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असून लोक भडकले आहेत. साईबाबांची घुमटी ही कोमुनिदाद जागेत रस्त्याशेजारी आहे त्यामुळे कोमुनिदादने स्थानिक पंचायतीतडून ना हरकत दाखला घेऊन या ठिकाणी 9 गाडे घालण्यास परवानगी दिली आहे. कोमुनिदादने ही जागा भाडय़ाने देऊन या ठिकाणी गाडे घालण्यास पाहत आहे. पण याला स्थानिकांचा विरोध आहे. आम्ही या ठिकाणी 100 मीटरच्या आत गाडे घालायला देणार नाही. या विरोधामुळे हा मोडतोडीचा प्रकार घडल्याचा संशय आम्हाला येत आहे. घुमटीची मोडतोड करून धार्मिक सलोखा बिघडविला आहे. आसगावात सर्व धर्माचे लोक राहत आहे अशा प्रकरणामुळे आमच्यात फुट पडणार आहे. याचा पोलिसांनी योग्य तपास करून वेषिवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी गावचे स्थानिक विष्णू तळकटकर यांनी केली आहे.

अनेक वर्षापासून या ठिकाणी ही साईबाबाची घुमटी आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी दिवजोत्सव होतो. पण ही जागा कोमुनिदादची असल्याने ती जागा ते विकण्यास पाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी जेसीबी ालवून साफ करण्यात आले होते. आमचा या ठिकाणी गाडे घालण्यास तीव्र विरोध होता यामुळे हा प्रकार घडला असल्याची शंका आहे असे गावची स्थानिक महिला आनंदी शिरगावकर यांनी सांगितले.

Related Stories

विजय सरदेसाईंकडून ऑक्सिजन पेढीची घोषणा

Amit Kulkarni

राज्यपालांकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Omkar B

काणकोणातून इजिदोर फर्नांडिस अपक्ष म्हणून लढणार

Amit Kulkarni

काँग्रेसने सत्तास्थापनेची स्वप्ने पाहू नये

Omkar B

मुख्यमंत्री वाराणसीकडे रवाना

Amit Kulkarni

वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंतच्या राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचे उद्घाटन

Amit Kulkarni