Tarun Bharat

आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय

मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी ताटकळत : व्यवस्था करण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

मध्यवर्ती बसस्थानकात आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसस्थानकात आसनाची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे थंडावलेली बससेवा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. शिवाय प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. त्याबरोबरच शाळा-कॉलेज महाविद्यालयांना परवानगी दिल्याने पासधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र बसस्थानकात काही ठिकाणी निवाऱयाची सोय नसल्याने प्रवाशांना भर उन्हातच थांबावे लागत आहे.

दररोज हजारो प्रवाशांनी गजबजलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना असुविधांचा अधिक सामना करावा लागत आहे. परिवहन मंडळाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बसस्थानकात ठेवण्यात आलेली आसने अपुरी पडत असल्याने प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे. त्यामुळे आवारात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्ते धुळीने माखले आहेत. त्यामुळे बाहेर थांबणाऱया प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असली तरी प्रवाशांना बसण्यासाठी आसने कमी पडत असल्याने ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीने आसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

माचाळी गावठाणचा वीजप्रवाह खंडित

Omkar B

खासगी जमिनींवरील अवैध मालमत्ताधारकांना मिळणार हक्कपत्रे

Patil_p

शेतजमीन खरेदी अन् भू-सुधारणा कायद्यातील दुरुस्ती

Amit Kulkarni

बिबटय़ासाठी आता मुधोळ श्वान मैदानात

Amit Kulkarni

भव्य नृत्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

तांत्रिक युगात खेळ महत्त्वाचे : जिल्हाधिकारी नितेश पाटील

Amit Kulkarni