Tarun Bharat

आसाममध्ये बंद होणार शासन संचालित मदरसे

विधानसभेत विधेयक सादर :

गुवाहाटी

 आसाममध्ये सरकारी मदरसे बंद करण्यासाठी सोमवारी विधानसभेत विधेयक मांडण्यात आले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी हे विधेयक मांडले आहे. हे विधेयक संमत झाल्यावर स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद होणार आहेत. आसाम विधानसभेचे तीन दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. राज्य सरकारने ‘शिक्षणाला धर्मनिरपेक्ष’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी मदरसे बंद करण्याची योजना नाही, परंतु त्यांना अभ्यासक्रमात विज्ञान आणि गणित यासारखे विषय सामील करावे लागतील आणि नोंदणीही करून घ्यावी लागणार आहे. घटनात्मक तरतुदींचा आदर करत मदरशाचे स्वरुप कायम राखू इच्छित असल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे.

Related Stories

लसीकरणाची वर्षपूर्ती; टोचले 157 कोटी डोस

datta jadhav

भारतात कोरोनाचे आणखी दोन नवे स्ट्रेन

datta jadhav

अयोध्येत दंगलीचा कट; मशिदीबाहेर फेकले डुकराचे मांस, आक्षेपार्ह पोस्टर्स

datta jadhav

वन रँक वन पेन्शनप्रकरणी केंद्र सरकारची बाजू योग्य

Patil_p

अज्ञाताचा अजित डोवाल यांच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न

datta jadhav

पायलटला ह्रदयविकाराचा झटका; बांग्लादेशच्या विमानाचे नागपुरात लँडींग

Tousif Mujawar