Tarun Bharat

आसाममध्ये भाजपला धक्का; BPF ने सोडली साथ

Advertisements

ऑनलाईन टीम / दिसपूर : 

आगामी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असतानाच आसाममध्ये भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटने (BPF) भाजपची साथ सोडली आहे.  भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

आसाममधील बोडोलँड बेल्टमध्ये BPF पक्षाचे  वर्चस्व आहे. 2006 सालापासून हा पक्ष बोडोलँड बेल्टमध्ये सर्व 12 जागा जिंकल्या आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बोडोलँड टेरिटोरियल काउंसिलच्या निवडणुकीत भाजपाने BPF ला सोबत घेतले नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील संबंध ताणले गेले होते. तरीही या निवडणुकीत BPF ला 17, भाजपाला 9, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलला 12 जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजप आणि BPF मध्ये तणावाचे वातावरण असल्याने BPF चे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ‘महाजाथ’सोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘महाजाथ’ ही BPF सह सहा पक्षांची काँग्रेस आघाडी असेल.

Related Stories

राजू श्रीवास्तव 15 दिवसांनी शुद्धीवर

Amit Kulkarni

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

datta jadhav

राणा दाम्पत्याविरोधात याचिका दाखल

Abhijeet Shinde

लोकसभेसाठी काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देऊ शकते – प्रशांत किशोर

Sumit Tambekar

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून संघाच्या भाजपला कानपिचक्या

Patil_p

‘कोरोना’चे भय संपता संपेना!

Patil_p
error: Content is protected !!