आसामच्या शिक्षण विभागात मोठय़ा घोटाळय़ाचा खुलासा झाला आहे. 2018-19 च्या शैक्षणिक सत्रात सुमारे 3 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेतच नसल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांच्या नावावर निधी प्रदान करत मध्यान्ह आहार, पुस्तके, गणवेशावर मोठय़ा स्तरावर घोटाळे झाले आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणी दोषींच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.


previous post
next post