Tarun Bharat

आसाममध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप

Advertisements

मेघालय, पश्चिम बंगाल, बांगलादेशता जाणवले धक्के

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममध्ये बुधवारी सकाळी 5.2 तीव्रतेचे भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे हे धक्के बांगलादेशसह शेजारी राज्य मेघालय आणि पश्चिम बंगालच्या उत्तर हिस्स्यांमऋध्येही जाणवले आहेत. पण जीवित तसेच वित्तीय हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

बुधवारी सकाळी 8.45 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याचे केंद्र लोअर आसामच्या गोलपारा येथे होते अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या अहवालात देण्यात आली आहे. 

भूकंपाच्या धक्क्यानंतर गुवाहाटी आणि मेघालयसह लोअर आसामच्या जिल्हय़ांमधील लोक दहशतीने घराबाहेर पडले. भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार आणि जलपाइगुडी येथेही जाणवले आहेत.

ढाका, गैबांधा आणि राजशाही समवेत बांगलादेशच्या काही हिस्स्यांमध्येही याचे धक्के जाणवले आहेत. ईशान्य भारत भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने तेथे भूकंपाचे धक्के जाणवत असतात. 28 एप्रिल रोजी या भागात 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

सोमवारी रात्री उशिरा दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के होते. तर 20 जून रोजी दिल्लीत 2.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. मागील वर्षापासूनच दिल्ली-एनसीआरमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, पण यातील बहुतांश भूकंपांची तीव्रता कमी राहिली आहे.

Related Stories

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त!

Rohan_P

चिंता वाढली : दिल्लीत एका दिवसात 1024 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

अभिनेता सोनू सुदच्या घरासह कार्यालयावर ‘प्राप्तिकर’ची धाड

Amit Kulkarni

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 23 मे पर्यंत वाढ; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची घोषणा

Rohan_P

खासगी कंपन्या आता प्रक्षेपक तयार करणार

Patil_p

46 दिवसांमध्ये आमदाराने तीनवेळा बदलला पक्ष

Patil_p
error: Content is protected !!