Tarun Bharat

आसाम काँग्रेसला आणखी एक झटका

Advertisements

आमदार सुशांत बोरगोहेन यांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाम विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. जोरहाट जिल्हय़ातील थौरा विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा विजयी झालेले काँग्रेसचे आमदार सुशांत बोरगोहन यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेस समितीचे महासचिव अपूर्व कुमार भट्टाचार्जी यांनी बोरगोहेन यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

बोरगोहेन यांच्या राजीनाम्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. बोरगोहेन मागील काही काळापासून संपर्कात आहेत. 1 ऑगस्ट रोजी ते भाजपमध्ये अधिकृतपणे सामील होतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश यांनी म्हटले होते. थौराचे आमदार सुशांत यांनी ई-मेलद्वारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांना स्वतःचा राजीनामा पाठविला होता.

बोरगोहन यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, याच्या उत्तरादाखल त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल आम्ही कायदेशीर तज्ञांसोबत सल्लामसलत करत आहोत असे बोरा यांनी म्हटले आहे.

Related Stories

इटलीहून आलेल्या विमानातील 179 पैकी 125 पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार

datta jadhav

आसाम-मेघालय सीमेवर 6 ठार

Patil_p

राज्यात 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Patil_p

लडाखमध्ये भूकंप, जीवितहानी नाही

Patil_p

वायदे बाजारात सोने-चांदीचे दर घसरले

datta jadhav
error: Content is protected !!