Tarun Bharat

आस्मानी संकटात मदतीचा हात : श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी

प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव

‘निसर्ग’ चक्रीय वादळाने आधीच कोरोनाग्रस्त असणा-या महाराष्ट्राच्या संकटात अधिक भर टाकली. कोरोनाने हाताला रोजगार नाही, पोटाला पुरेस अन्न नाही अशा अवस्थेत जगणाऱ्या लोकांची परिस्थिती अचानक आलेल्या निसर्ग वादळाने अधिकच बिकट केली. एक आधार म्हणून असणारा निवारा उडून गेल्याने लोकांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याचे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांची स्थिती दिसून येते. कोरोनाच्या संकटात कणेरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी हे या ‘निसर्ग’ वादळाच्या संकटात ज्यांची घरे पडली आहेत त्यांना मदत करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन गेली सहा दिवस काम करत आहेत. या वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वामीजींनी गवंडी, लोहार, सुतार, प्लंबर, वेल्डर, इलेक्ट्रिकल असे सुमारे १०० लोकांची टीम, सोबत सिमेंट, पत्रे, संसारोपयोगी साहित्य, कौले अशा साहित्यांचे अनेक ट्रक भरून सामान घेऊन दस्तूर खुद्द स्वामीजी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी तळकोकणात उतरले आहेत.

पाजपंढरी, खरसई, खेड, दापोली, चिपळूण सह रायगड जिल्ह्यातील काही भागात हे मदतकार्य चालू आहे. स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली मठाच्या वतीने घरांच्या छताची मापे घेवून छत उभारण्याचे काम पहिल्या काही तासातच सुरु झाल्याचे पाहून स्वामीजींच्या अचूक नियोजनाबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुनर्वसनासाठी सिद्धगिरी निसर्ग वादळ मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून, सर्वच आपतग्रस्तांना लाभ मिळावा म्हणून समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे. आपण आपली मदत घर बांधणी, दुरुस्तीसाठी विटा, सिमेंट, पत्रे, वाळू. लोखंडी सळई, बांधकाम साहित्य, दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल साहित्य, संडास-बाथरूमसाठी लागणारे प्लंबिंग साहित्य, कौले (जुनी असली तरी चालतील), मेणबत्ती,काडेपेटी, शैक्षणिक साहित्य- वह्या, कंपास, पेन, स्कुल बॅग अशा स्वरूपात अथवा आपण आर्थिक स्वरूपात हि मदत करू शकता. आपण आपली आर्थिक मदत पुढील खात्यात जमा करू शकता.

या साठी बँक खाते तपशील – ‘सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशन’ इंडियन बँक, शाखा- शाहूपुरी, कोल्हापूर चालू खाते नंबर : 6134137407,IFSC No. IDIB000k044.

Related Stories

”वारसास्थळे, पर्यटनस्थळे मोहिमेत सहभागी व्हा”

Archana Banage

विद्यापीठ उपकेंद्राने व्यवसायाभिमूख शिक्षण द्यावे

datta jadhav

महाराष्ट्रात दिवसभरात 2,630 नवे रुग्ण ; 42 मृत्यू

Tousif Mujawar

साताऱयात कोरोना चाचणी सुरू, 25 पॉझिटिव्ह

Archana Banage

”उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”

Archana Banage

‘NSS’च्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यास मंजुरी

datta jadhav