Tarun Bharat

आहार हवा हृदयस्नेही

सध्याच्या आधुनिक जीवनशैलीतील शारीरिक श्रमाची कमतरता, वाढता तणाव, वाढती स्पर्धा, कामाचा वाढता बोजा, व्यायामाचा अभाव आणि आहारातील चुका, यांच्या कारणाने हृदयरोग वाढत आहेत. अशा वेळी  आपल्या डाएटमध्ये बदलाव करून सुधारणा करून हृदयरोगांपासून दूर राहता येईल.

  • यासाठी आपल्या भोजनात माशांचा समावेश करावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
  • दररोज कमीत कमी 30 ग्रम अथवा आठवडय़ातून दोन अथवा तीन वेळा मासे खावेत.
  • माशांमध्ये हृदयासाठी लाभप्रद असलेले फॅटी-ऍसिड ओमेगा-3 असते. भोजनात लसूण आणि कांदा भरपूर घ्यावेत. यांमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट याच असतात. जे रक्तवाहिन्यांना ब्लॉक होऊ देत नाहीत. ऑलिव्ह ऑईल आणि रेपसीड ऑईलचा उपयोग करावा.
  • अमेरिकन जनरल ऑफ ऍपीडेमियो लॉजीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार नियमित रूपात मल्टी-व्हिटॅमिन टॅबलेट आणि व्हिटॅमिन ए, सी, आणि ई टॅबलेट घेतल्यास हृदयाच्या आजारांची शक्यता फार कमी होते.
  • आपल्या हृदयाची धडधड कित्येकवेळा असामान्यपणे वाढत असेल आणि आपसात कॉफी पिण्याची सवय असेल तर दिवसभरात दोनपेक्षा अधिक कप कॉफी घेऊ नये.
  • एकदा हार्ट ऍटॅक येऊन गेलेल्या रुग्णांसाठी आहारातील बदल अत्यंत गरजेचा ठरतो. कारण अशा बदलावाने रक्तवाहिन्यांचे अधिक नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो आणि पुन्हा हार्ट ऍटॅक येण्याची शक्यता फार कमी होते.
  • यासाठी अधिक चरबी असलेले मांस आणि दूध आणि दुधापासून बनविलेल्या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे.

Related Stories

अधोमुखवृक्षासन

Omkar B

कॉव्हिडची लस घेताना

Amit Kulkarni

कोविडग्रस्त मातांनी स्तनपान करावे का ?

Amit Kulkarni

कोरोना संसर्ग आणि दमटपणा

Omkar B

हैपीटीएट्सचे औषद कोरोनावर प्रभावी

Amit Kulkarni

गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी पित असाल तर व्हा सावधान…

Archana Banage