Tarun Bharat

आ. नीतेश राणे यांच्यातर्फे गणेशोत्सवात मोफत ‘मोदी एक्सप्रेस’

Advertisements

वार्ताहर /कणकवली:

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येऊ इच्छिणाऱया चाकरमान्यांसाठी आमदार नीतेश राणे यांनी विनामूल्य गणेश स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेनची व्यवस्था केली आहे. दादर ते सावंतवाडी अशी धावणारी ही एकदिवशीय ट्रेन 7 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता दादर येथील फलाट क्रमांक 8 वरून सुटणार आहे. 1800 प्रवासी याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

आमदार राणे हे दरवर्षी गणेशभक्त चाकरमान्यांसाठी एसटी गाडय़ा सोडतात. यावर्षी त्यांनी थेट विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना केंद्रीय लघु, सूक्षम व मध्यम उद्योग मंत्रिपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणी जनतेवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. या प्रेमातून उतराई होण्यासाठी ‘मोदी एक्स्प्रेस ट्रेन’ सोडण्यात येत आहे.

1800 चाकरमानी या ट्रेनचा लाभ घेऊ शकतील. ट्रेनमधील प्रवाशांसाठी एकवेळचे जेवाणही मोफत आहे. यासाठी गणेशभक्त प्रवाशांनी 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत आरक्षण करायचे आहे. आरक्षणासाठी भाजपचे देवगड मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर, डॉ. अमोल तेली, वैभववाडी अध्यक्ष नासीर काझी, कणकवली अध्यक्ष मिलिंद मेस्त्राr, संतोष कानडे यांच्याशी संपर्क साधावा, आवाहन आमदार राणे यांनी केले आहे.

Related Stories

रत्नागिरीत पुन्हा येण्याचे दिदींचे स्वप्न राहिले अधुरे!

Patil_p

24 तास, 102 रूग्ण, 5 मृत्यू

Patil_p

जिह्यात कोरोनाचे तब्बल 155 नवे रूग्ण!

Patil_p

दिवाळी सुट्टी कमी करणाऱया शासन आदेशाची होळी

Patil_p

सावजाचा पाठलाग नडला, बिबटय़ा विहिरीत पडला

Patil_p

रत्नागिरी : माडबन मिठगवाणे परिसरात शिकारीसाठी वापरण्यात येणारा गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!