Tarun Bharat

इंगळीत आजीच्या पैश्यावर नातवाचा डल्ला

महापूराचे नुकसान भरपाई आलेले पैसे बनावट सही करुन परस्पर उचलले.

प्रतिनिधी / कोल्हापूर

इंगळी (ता. हातकणंगले) येथील एका वयोवृध्द महिलेला महापूर नुकसान भरपाई पोटी आलेल्या पैश्यावर ‘विघ्नेश’ नामक नातवंडाने डल्ला मारल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. या महाठक नातवंडाने आजीचे धनादेश चोरुन, त्यावर आजीची हुबेहुब सही करुन, कोल्हापूरातील शाहुपुरीमधील एका बँकेतून पैसे उचलले आहे. याप्रकरणाने गावात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षीच्या पंचगंगा नदीला आलेल्या महापूराचा तडाका इंगळी गावामधील 78 वर्षीय एका वयोवृध्द आजीच्या राहत्या घराला बसला. त्या आजीच्या घराची मोठी पडझड झाली. या घराच्या पडझडीचे नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून नुकतेच आजीच्या बँक खात्यावर 95 हजार रुपये जमा झाले आहेत. पैसे जमा झाल्याची माहिती आजीच्या ‘विघ्नेश’ नामक नातवाला समजली. त्याने त्या वयोवृध्द आजीच्या राहत्या घरात प्रवेश करुन, त्याने आजीचे धनादेश चोरले. त्या धनादेशावर आजीची हुबेहुब सही करुन कोल्हापूरातील शाहुपुरीतील एका बँकेतून परस्पर 86 हजार रुपये लंपास केले. हा प्रकार संबंधीत आजीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आपल्या विवाहित मुलीच्या समवेत संबंधीत बँकेत धाव घेतली. मी बँकेमध्ये धनादेश न देता माझ्या बँक खात्यावरुन पैसे कोणी उचले. याबाबत शाखाधिकाऱयांच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान संबंधीत धनादेश तिच्या नातवंडाने बनावट सही करुन आजीच्या बँक खात्यावरुन पैसे परस्पर उचलले निदर्शनास आले.

हा सर्व प्रकार पाहुन आजीसह तिच्या विवाहीत मुलगीला चांगलाच मानसिक धक्का बसला. संबंधीत महाठक नातु हा कोल्हापूरातील शाहुपुरीतील एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी करीत आहे. त्याने केलेला हा संपूर्ण प्रकार तो नोकरी करीत असलेल्या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱयांना समजला असून, त्यांने संस्थेमध्ये बनावट सह्या करुन काही अपहार केला आहे काय यांची चौकशी सुरु केली आहे

Related Stories

दूध दर वाढ आंदोलन : महायुतीच्या वतीने महादेवाला दुग्धाभिषेक

Archana Banage

फोन करताच रक्तदाता हजर

Patil_p

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये कराड देशात अव्वल

Patil_p

युवकास लुटणारे तिघेजण जेरबंद

Patil_p

हत्तीप्रवण भागातील शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई

Archana Banage

सावरवाडी येथे ऊस शेतीस आग; अडीच लाखाचे नुकसान

Archana Banage