Tarun Bharat

इंग्लंडचा ‘नॉक आऊट’मध्ये प्रवेश

वेल्सवर तीन गोल्सनी मात, रॅशफोर्डचे 2 गोल

वृत्तसंस्था/ कतार

वेल्सचा 3-0 असा आरामात पराभव करून इंग्लंडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम 16 संघात स्थान मिळविले. अहमद बिन अली स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला आणि इंग्लंडने या स्पर्धेतील सर्व तीन गोल दुसऱया सत्रात केले.

‘ब’ गटात अव्वल स्थान राखताना इंग्लंडने तीन सामन्यांतून दोन विजय मिळविले व एक सामना बरोबरीत सोडविला. त्यांचे 3 सामन्यांतून 7 गुण झाले. या गटात अमेरिकेचे तीन सामन्यांतून एक विजय व दोन बरोबरीने 5 गुण झाले आणि दुसऱया स्थानाने त्यांनीही या स्पर्धेची ‘नॉकआऊट’ फेरी गाठली. या गटात असलेल्या इराण व वेल्स संघांना स्पर्धेतून बाद व्हावे लागले. आता उप-उपान्त्यपूर्व फेरीत इंग्लंडचा मुकाबला ‘अ’ गटात दुसऱया स्थानावर राहिलेल्या सेनेगल संघाशी रविवारी होणार आहे.

इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो त्यांचा मार्पुस रॅशफोर्ड. त्याने दोन गोल केले तर एक गोल फिल फोडनने केला. या सामन्यात इंग्लंडने अमेरिकेविरूद्ध खेळलेल्या संघातून चार बदल केले. यात फिल फोडन, काईल वॉकर, जॉर्डन हँडरसन व रॅसफोर्ड यांना पहिल्या अकरा खेळाडूंत स्थान मिळाले.

वेल्सचे प्रशिक्षक रॉबर्ट पेझ यांनी इराणविरूद्ध दिशाहीन खेळ केलेल्या गॅरेथ बेल व ऍरोन रॅमसे यांना या सामन्यातही खेळविले तर तीन बदल करताना ज्यो ऍलन, डॅनियल जेम्स व निलंबित असलेला गोलरक्षक वेन हॅन्निसेच्या स्थानावर वार्ड याला संधी दिली.

या सामन्यातील पहिल्या सत्रात निर्विवादपणे इंग्लंडचे वर्चस्व दिसून आले. सामन्याच्या 26 व्या मिनिटाला इंग्लंडच्या रॅशफॉर्डला गोल करण्याची संधीही मिळाली होती. मात्र यावेळी त्याला प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला भेदण्यास अपयश आले.  त्यापूर्वी नवव्या मिनिटाला वेल्सचा गोलरक्षक डॅनी वेडने हॅरी केनने दिलेल्या पासवर  रेशफॉर्डचा फटका अडवून संघावर होणारा गोल टाळला.

दुसऱया सत्रात आरंभालाच 50 व्या मिनिटाला इंग्लंडने गोल करून आघाडी घेतली. मार्पुस रॅशफॉर्डने मारलेला फ्री किकवरील फटका गोलमध्ये कधी जाऊन विसावला हे वेल्सचा गोलरक्षक डॅनी वेडला कळले देखील नाही. केवळ दोन मिनिटांत इंग्लंडने दोन गोल केले. 52 व्या मिनिटाला हॅरी केनने दिलेल्या एका ‘लो क्रॉस’ पासवर फिल फोडनने वेडला भेदले व इंग्लंडची आघाडी दोन गोलानी वाढविली.

दोन गोलांच्या आघाडीनंतर इंग्लंडने आपल्या खेळातील आक्रमकता आणखी वाढविली व 68व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. वेल्सच्या उजव्या बगलेतून मिळालेल्या चेंडूवर मार्पुस रॅशफॉर्डने प्रतिस्पर्धी बचाव भेदला व चेंडूला जाळीत टोलविले. सामन्याच्या शेवटच्या क्षणी जॉन स्टोन्सनने अगदी जवळून हाणलेला फटका गोलमध्ये जाताना किंचित हुकल्याने इंग्लंडची चौथा गोल करण्याची संधी हुकली. 2006 विश्वचषक स्पर्धेनंतर प्रथमच इंग्लंडने लीगमध्ये गटात अग्रस्थान प्राप्त केले.

आजचे सामने

1) क्रोएशिया वि. बेल्जियम

वेळ ः रात्री 8.30 वा.

2) कॅनडा वि. मोरोक्को

वेळ ः रात्री 8.30 वा.

3) जर्मनी वि. कोस्टारिका

वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.

4) जपान वि. स्पेन

वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.

Related Stories

मोहालीच्या हॉकी स्टेडियमचे नामकरण

Patil_p

कोरोना चाचणीत मोहम्मद आमीर निर्दोष

Patil_p

सौरभ चौधरी, महिला नेमबाजी संघाला कांस्यपदके

Amit Kulkarni

लक्ष्य सेन, श्रीकांत यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Patil_p

अनिश भनवालाला 4 सुवर्णपदके

Patil_p

स्पेन-स्वीडन रोमांचक लढत अखेर बरोबरीत

Patil_p