Tarun Bharat

इंग्लंडचा न्यूझीलंडविरुद्ध ‘क्लीन स्वीप’

Advertisements

लीड्स / वृत्तसंस्था

जो रुट (नाबाद 86), ऑलि पोप (82) व जॉनी बेअरस्टो (44 चेंडूत नाबाद 71) यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातही 7 गडी राखून धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांची ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. विजयासाठी 296 धावांचे टार्गेट इंग्लंडने केवळ 54.2 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात पार केले. जॅक लीच सामनावीर तर जो रुट मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

लॉर्ड्स व ट्रेंट ब्रिजप्रमाणेच येथील सामन्यातही इंग्लंडसमोर चौथ्या डावात 300 धावांच्या आतील टार्गेट होते. लॉर्ड्सवर 277 तर ट्रेंट ब्रिजवर 299 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणाऱया इंग्लंडने येथेही तोच धडाका कायम राखला आणि सलग तिसरा विजय नोंदवला. बेअरस्टोने येथे अवघ्या 29 चेंडूतच अर्धशतक साजरे केले. नंतर तो 44 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 71 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडतर्फे कसोटीतील हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. जो रुट 125 चेंडूत 86 धावांवर नाबाद राहिला. मात्र, डॅरेल मिशेलच्या तिन्ही कसोटीत शतक झळकावण्याच्या विक्रमाशी तो बरोबरी करु शकला नाही.

रुट व बेअरस्टो यांनी चौथ्या गडय़ासाठी अवघ्या 87 चेंडूत 111 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. या मालिकेतील पहिल्या 3 डावांत 1, 16 व 8 अशा किरकोळ धावसंख्येवर बाद व्हावे लागलेल्या बेअरस्टोने नंतर मात्र 293 चेंडूत 369 धावांची आतषबाजी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 329.

इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 360.

न्यूझीलंड दुसरा डाव ः सर्वबाद 326.

इंग्लंड दुसरा डाव ः (टार्गेट 296) ः 54.2 षटकात 3 बाद 296 (ऑलि पोप 108 चेंडूत 12 चौकारांसह 82, जो रुट 125 चेंडूत 11 चौकार, 1 षटकारांसह नाबाद 86, जॉनी बेअरस्टो 44 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 71. अवांतर 23. टीम साऊदी 1-68, ब्रेसवेल 1-109).

Related Stories

विश्व यू-20 ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताला रौप्य

Patil_p

युरोपियन हंगाम ऑगस्टमध्ये संपेल : सिफेरिन

Patil_p

शकीब अल हसनचे संघात पुनरागमन

Patil_p

अमिरात किंवा लंकेत आयपीएल स्पर्धा होवू शकते : गावसकर

Patil_p

माजी रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन

Abhijeet Shinde

भारतीय महिला फुटबॉल संघाचा ब्राझीलविरुद्ध सामना

Patil_p
error: Content is protected !!