Tarun Bharat

इंग्लंडचा मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार

Advertisements

वृत्तसंस्था/ लीडस् (ब्रिटन)

2019 साली आयसीसी वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा जिंकणाऱया इंग्लंड संघाचे नेतृत्व करणारा क्रिकेटपटू इयान मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषण केल्याची माहिती बीबीसीने दिली आहे.

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली 2019 साली पहिल्यांदा आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडने जिंकण्याचा पराक्रम केला होता. या कामगिरीनंतर इंग्लंडने आयसीसीच्या वनडे आणि टी-20 सांघिक मानांकनात आघाडीचे स्थान मिळविले होते. 35 वर्षीय मॉर्गनला वारंवार दुखापतीमुळे तंदुरूस्ती समस्येला तोंड द्यावे लागले होते. क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागल्याने त्याने फलंदाजीचा सूरही गमविला होता. हॉलंडविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यामध्ये मॉर्गनला आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर स्नायू दुखापतीमुळे त्याने या मालिकेतील तिसऱया सामन्यांतून माघार घेतली होती. इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 7 जुलैपासून प्रारंभ होत आहे. आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळविली जाणार आहे. 2023 साली भारतात होणाऱया आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आता मॉर्गनच्या जागी जोस बटलरला  कर्णधार म्हणून निवडले जाईल, असा अंदाज आहे.

मॉर्गनने इंग्लंडतर्फे वनडे आणि टी-20 या प्रकारात सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. 225 वनडे सामन्यांत मॉर्गनने 6957 तर 115 टी-20 सामन्यांत त्याने 2458 धावा जमविल्या आहेत. इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये मॉर्गन मिडलसेक्स क्लबकडून खेळत आहे. मॉर्गनने इंग्लंडकडून 16 कसोटी सामन्यांत खेळताना दोन शतके झळकविली असून त्याने 2012 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. माजी कर्णधार ऍलिस्टर कूक निवृत्त झाल्यानंतर इंग्लंड आणि वेल्सच्या क्रिकेट मंडळाने 2015 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी मॉर्गनची नियुक्ती केली होती.

Related Stories

रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिदान कोरोनाबाधित

Patil_p

पंजाबची विजयाने साखळी फेरीची सांगता

Patil_p

अन् 437 दिवसानंतर धोनी मैदानात उतरला!

Patil_p

भारतीय मुष्टियुद्ध संघ दुबईत दाखल

Patil_p

विजय हजारे करंडक स्पर्धा

Patil_p

क्रेजिकोव्हा अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!