Tarun Bharat

इंग्लंडच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ट्रॉट

वृत्तसंस्था/ लंडन

 इंग्लंड क्रिकेट संघाकरिता इंग्लंडचा माजी फलंदाज आणि कसोटीवीर जोनाथन ट्रॉटची फलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ही घोषणा दिली असून येत्या बुधवारपासून पाकबरोबरच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेकरिता ट्रॉटची ही नियुक्ती करण्यात आल्याचे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.

 2009 ते 2015 या कालावधीत 39 वर्षीय जोनाथन ट्रॉटने 52 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 3835 धावा जमविल्या आहेत. आता इंग्लंडच्या क्रिकेट संघाला ट्रॉट तसेच न्यूझीलंडचे माजी कसोटीवीर आणि फिरकी गोलंदाज जितेन पटेल आणि वॉर्विकशायरचा वेगवान गोलंदाज ग्रीम वेल्च यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ट्रॉटने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 68 वनडे आणि सात टी-20 सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. ट्रॉटने  प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 18,662 धावा जमविल्या आहेत. पाक आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी येत्या बुधवारपासून ओल्ड ट्रफोर्ड येथे सुरू होईल. अलिकडे इंग्लंडने विंडीज विरूद्धची कसोटी मालिका 1-1 अशा फरकाने जिंकली आहे.

Related Stories

बांगलादेश मंडळाकडून क्रिकेटपटूंचा आरोप फेटाळला

Patil_p

श्रीकांत, जॉली-गायत्रीचे आव्हान समाप्त

Patil_p

मेनोर्का बुद्धिबळ स्पर्धेत गुकेश विजेता

Patil_p

आगामी मालिकेत बांगलादेशची सत्त्वपरीक्षा- तमिम इक्बाल

Patil_p

प्रेंच टेनिस स्पर्धा खरेदी तिकीटांचे पैसे देणार

Patil_p

स्कॉटिश महिला फुटबॉल स्पर्धेत बालादेवीचा गोल

Patil_p