Tarun Bharat

इंग्लंडला 130 धावांची आघाडी, जो रूटचे झुंजार द्विशतक

गॅले

कर्णधार जो रूटच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर (228) येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी इंग्लंडने यजमान श्रीलंकेवर पहिल्या डावात 286 धावांची भक्कम आघाडी मिळविली. लंकेच्या फलंदाजीत दुसऱया डावात सुधारणा दिसत असून त्यांनी दुसऱया डावात दिवसअखेर 2 बाद 156 धावा जमविल्या. कुशल परेरा आणि थिर्मेनी यांनी शानदार अर्धशतके झळकविली. लंकेचा संघ अद्याप 130 धावांनी पिछाडीवर असून इंग्लंडची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

या कसोटी सामन्यात लंकेचा पहिला डाव 135 धावांत आटोपला नंतर इंग्लंडने 4 बाद 320 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 421 धावांवर आटोपला. इंग्लंडचे शेवटचे 6 फलंदाज 101 धावांची भर घालून तंबूत परतले. कर्णधार रूटने शानदार द्विशतक झळकविताना 321 चेंडूत 228 धावा जमविल्या. लॉरेन्सने 73 तर बटलरने 30 धावा केल्या. रूट शेवटच्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतला. लंकेतर्फे डी परेराने 4 तर इंबुलडेनियाने 3 आणि ए फर्नांडोने 2 गडी बाद केले.

286 धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने आपल्या दुसऱया डावाला चिवट सुरूवात केली. पहिल्या डावाच्या तुलनेत लंकेच्या फलंदाजीमध्ये बरीच सुधारणा दिसून आली. लंकेने दिवसअखेर दुसऱया डावात 61 षटकांत 2 बाद 156 धावा जमविल्या. कुशल परेरा आणि थिर्मेनी यांनी सलामीच्या गडय़ासाठी 101 धावांची भागिदारी केली. परेराने 109 चेंडूत 62 धावा जमविल्या. थिर्मेनी 76 धावांवर  तर नाईटवॉचमन इंबुलडेनिया शुन्य धावांवर खेळत आहे. कुशल मेंडीस 15 धावावर बाद झाला. इंग्लंडतर्फे करेन आणि लिच यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव सर्वबाद 135, इंग्लंड प. डाव- 117.1 षटकांत सर्वबाद 421 ( रूट 228, लॉरेन्स 73, बटलर 30, बेअरस्टो 47, ब्रॉड नाबाद 11, डी. परेरा 4-109, इंबुलडेनिया 3-176, ए फर्नांडो 2-44), लंका दु. डाव- 61 षटकांत 2 बाद 156 (थिर्मेनी खेळत आहे. 76, कुशल परेरा 62, कुशल मेंडीस 15, लिच 1-67, करेन 1-25).

Related Stories

आयर्लंड-झिंबाब्वे वनडे मालिका बरोबरीत

Patil_p

लखनौ सुपर जायंट्सचा चौथा विजय

Patil_p

जिल्हय़ात सोमवारपासून लाळय़ा खुरकत लसीकरण मोहीम

Patil_p

भारतीय फुटबॉलपटूकडून गरजू लोकांची सुटका

Patil_p

पी. व्ही. सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओला नमवत जिंकले कांस्य पदक

Archana Banage

रविंद्र जडेजाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p