Tarun Bharat

इंग्लंडला 296 धावांचे आव्हान

न्यूझीलंडविरुद्ध तिसरी कसोटी ः ब्लंडेल, मिशेलची अर्धशतके, लीचचे सामन्यात 10 बळी

वृत्तसंस्था/ लीड्स

तिसऱया व शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने चौथ्या दिवशी दुसऱया डावात सर्व बाद 360 धावा जमवित इंग्लंडला 296 धावांचे माफक आव्हान दिले आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी याआधीच घेतली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 329 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने 360 धावा जमवित 31 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने 5 बाद 168 या धावसंख्येवरून चौथ्या दिवसाच्या खेळास सुरुवात केली. ब्लंडेल व डॅरील मिशेल यांनी शानदार अर्धशतके नोंदवत संघाला पावणेतीनशेची मजल मारून दिली. मिशेलने 9 चौकारांसह 56 तर ब्लंडेलने 161 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा जमविल्या. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 113 धावांची भागीदारी केली. ब्लंडेलने नंतर तळाच्या फलंदाजांच्या साथीने संघाला 326 धावांची मजल मारून दिली. इंग्लंडच्या लीचने दुसऱया डावातही पाच बळी मिळवित सामन्यात 166 धावांत 10 बळी टिपण्याचा पहिल्यांदाच पराक्रम केला. पॉट्सने 3, ओव्हर्टन व रूट यांनी एकेक बळी मिळविले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडने 13 षटकांत 2 बाद 56 धावा जमविल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड प.डाव 329, इंग्लंड प.डाव 360, न्यूझीलंड दु.डाव 105.2 षटकांत सर्व बाद 326 ः लॅथम 76, विल्यम्सन 48, मिशेल 56, ब्लंडेल नाबाद 88, अवांतर 17, लीच 566, पॉट्स 3-66, ओव्हर्टन 1-61, रूट 1-29. (चहापानापर्यंत)

बॉक्स  (26 एसपीओ 05-बेन फोक्स)

फोक्सला कोरोनाची लागण

इंग्लंडचा यष्टिरक्षक बेन फोक्सला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या जागी सॅम बिलिंग्सला कोरोना रिप्लेसमेंट म्हणून अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. तो केंटच्या व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट संघाचा सदस्य होता. त्याला तेथून थेट राष्ट्रीय संघात दाखल व्हावे लागले.

Related Stories

आशिया चषक स्पर्धेतून चमीरा बाहेर

Patil_p

भारताच्या विजयात चोप्राची चमक

Patil_p

झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेत नरसिंगकडे नेतृत्व

Patil_p

भारत अ संघाचा निसटता पराभव

Patil_p

कर्णधार रोहित शर्माला दंड

Patil_p

पुरुषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकचे रिलोव्हला सुवर्ण

Patil_p