Tarun Bharat

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ; सुर्यकुमार, क्रुणाल व कृष्णाला संधी

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद असून मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाणार आहे.

इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांचे लक्ष वेधले होते. यासोबतच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला व क्रुणाल पंड्याला देखील भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

23 मार्चला पहिला सामना तर 26 मार्चला दुसरा सामना व 28 मार्चला तिसरा सामना खेळविला जाणार आहे. हे सगळे सामने पुण्यात होणार आहेत.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

Related Stories

शिबिरासाठी 28 कनिष्ठ महिला हॉकीपटूंची निवड

Patil_p

डिंग्को सिंगला बॉक्सर्सकडून मदतीचा हात

Patil_p

फिफाकडून भारतीय फुटबॉल फेडरेशनवरील बंदी मागे

Patil_p

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा

Archana Banage

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रोसिटी प्रकरणात ५ दिवस पोलीस कोठडी

Archana Banage

बेडग येथे हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

Abhijeet Khandekar