Tarun Bharat

इंग्लंडात नोकरी देतो सांगून फसवणूक

संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 

प्रतिनिधी /मडगाव

फसवणुकीचा आरोप असलेल्या मूळ पश्चिम बंगालातील शिबाजी दास या 45 वर्षीय संशयित आरापीचा अटकपूर्व अर्ज मडगावच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

वास्को पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानुसार या प्रकरणातील वरील संशयित आरोपीने वास्को परिसरातील नॉयेल आल्बकेर्क व इतरांकडे संपर्क साधला आणणि  इंग्लंड देशात नोकरी देतो सांगून त्यांच्याकडून 2,65,000 रक्कम घेतली आणि त्यांना विदेशात नोकरी दिली नाही.

संशयित आरोपी नवेवाडे वास्को येथे राहात होता. पीडित लोकांनी त्याच्या घराकडे जाऊन चौकशी कली तेव्हा संशयिताच्या पत्नीने संशयित बाहेर गावी गेल्याचे उत्तर देऊन त्याची बोळवण केली.

या प्रकरणी संशयिताला चौकशीसाठी वास्को पोलिसानी बोलावणे पाठवले तेव्हा संशयित आरोपी पोलीस चौकीत हजर राहिला नाही. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सेंत डिसिल्वा यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मूळ पश्चिम बंगालातील शिबाजी दास याचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला.

Related Stories

जनतेची कामे अडणार नाहीत याची काळजी घ्या

Amit Kulkarni

पिछाडीवरून मुंबई सिटीचा चेन्नईनवर 6-2 असा मोठा विजय

Patil_p

ड्रग्सचा नायनाट करण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे

Amit Kulkarni

गोवा माईल्स रद्द करा अन्यथा पर्यटन मंत्री आणि पर्यटन महामंडळाच्या चेअरमनना घरी पाठवू : टेक्सी व्यवसाईकांचा इशारा

Amit Kulkarni

आगामी वर्षापासून महिलांचा उत्सव साजरा करण्याचा विचार

Amit Kulkarni

आपच्या काळ्या केकवर ‘हात-कमळाचा’ संगम

Patil_p