Tarun Bharat

इंग्लंड कसोटी संघाची घोषणा

Advertisements

वृत्तसंस्था/ सेंट जोन्स

इंग्लंडचा क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱयात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीला मंगळवारपासून अँटीग्वा येथे प्रारंभ होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ऍलेक्स लिस आणि साकीब मेहमूद यांचा समावेश करण्यात आला आहे.

जो रूटकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना वगळण्यात आले आहे. रॉबिन्सन अद्याप दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त झाला नसल्याने त्याला या मालिकेसाठी वगळण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने घेतला आहे.

इंग्लंड कसोटी संघ- रूट (कर्णधार), बेअरस्टो, क्रॉले, फोक्स, लॉरेन्स, लिच, लीस, साकीब मेहमूद, ओव्हरटन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.

Related Stories

नेमबाजीत मनीषला ‘सुवर्ण’; तर सिंघराजची ‘रौप्य’पदकाची कमाई

datta jadhav

लंकेच्या हसरंगाला समज

Patil_p

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून त्सोंगाची माघार

Patil_p

रात्रीची एफ-वन मोटार शर्यत लास व्हेगासमध्ये

Amit Kulkarni

सनरायजर्सचा विजयरथ रोखण्याचे आरसीबीसमोर आव्हान

Patil_p

भारत की पाकिस्तान? फैसला आज!

Patil_p
error: Content is protected !!