Tarun Bharat

इंग्लंड दौऱयावर जाण्यास तीन विंडीज खेळाडूंचा नकार

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 राखीव खेळाडूंचा समावेश, प्रेक्षकाविना सामने खेळवले जाणार, कसोटी मालिकेसाठी विंडीज संघ जाहीर

वृत्तसंस्था/ लंडन

कोरोनोच्या जोरदार प्रादुर्भावानंतर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे अनेक क्रिकेटपटू मैदानापासून दूर आहेत. अर्थात, तीन महिन्याच्या कालावधीनंतर या परिस्थितीत सुधारणा होत असल्याने पुढील महिन्यात इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी विंडीज निवड समितीने 14 सदस्यीय संघ जाहीर केला. तसेच 11 जणांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. पण, या दौऱयावर जाण्यास विंडीजच्या तीन खेळाडूंनी नकार दिला असून मंडळानेही या खेळाडूंच्या निर्णयाचा आदर राखत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

8 जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार असून हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकाविना खेळवले जाणार आहे. कोरोनानंतर क्रिकेट बंद झाल्यानंतर एखाद्या मालिकेसाठी संघ जाहीर करणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला आहे. 9 जून रोजी विंडीज संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार असून तब्बल एक महिनाभर ते सराव करणार आहेत. तसेच दौऱयावर जाण्यापूर्वी विंडीजच्या सर्व खेळाडूंची कोविड चाचणी होणार असल्याचे विंडीज मंडळाने स्पष्ट केले.

ब्रेव्हो, हेतमेयर, पॉलचा नकार

डॅरेन ब्रेव्हो, शिमरन हेतमेयर व किमो पॉलने इंग्लंडला जाण्यास नकार दिला असून त्यांच्या निर्णयाचा वेस्ट इंडिज बोर्डाने आदर केला आहे. या तीन खेळाडूंचा हा वैयक्तिक निर्णय आहे. सध्या जगभरात कोरोनाची धास्ती आहे तरीही या खेळाडूंनी नकार दिला असला तरी आगामी मालिकेसाठी त्यांच्या निवडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही विंडीज मंडळाने स्पष्ट केले.

 तसेच या संघातील सर्व सदस्यांना सुरक्षित वातावरणात ट्रेन करण्यात येणार असून यामध्ये त्यांची सर्व वैद्यकीय काळजी घेण्यात येणार आहे. ज्या 11 राखीव खेळाडूंची या मालिकेसाठी निवड केली आहे ते देखील इंग्लंडला जाणार असून सराव तसेच गरजेप्रमाणे ते संघातील खेळाडूंना पर्याय म्हणून उपलब्ध असतील, असेही मंडळाने स्पष्ट केले.

इंग्लंड दौऱयासाठी विंडीज संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, बॉनर, क्रेग ब्रेथवेट, शेमराह ब्रुक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रखीम कॉर्नवेल, शेन डॉवरीच, चेमार होल्डर, शाय होप, अल्झारी जोसेफ, रेमन रायफर व केमार रॉच.

इंग्लंड दौऱयासाठी विंडीजचे राखीव खेळाडू : सुनिल अंब्रिस, जोशुआ डी सिल्वा, शेनॉन गॅब्रियल, किऑन हर्डिंग, काईल मायर्स, प्रेस्टोन मॅकस्विन, मिंडले, शेन मोसेली, अँडरसन फिलिप, ओशाने थॉमस व जोमेल वॉरिकन.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक –

1. पहिली कसोटी – 8 ते 12 जुलै – एजस बाऊल, हॅम्पशायर

2. दुसरी कसोटी – 16 ते 20 जुलै – ओल्ड ट्रफर्ड, लँकेशायर

3. तिसरी कसोटी – 24 ते 28 जुलै – ओल्ड ट्रफर्ड, लँकेशायर

प्रेक्षकाविना सामने अन सुरक्षित वातावरणात सराव

वेस्ट इंडिज संघ 8 जून रोजी कोव्हिड चाचणी झाल्यानंतर एका खाजगी विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. 9 जून रोजी ते इंग्लंडमध्ये दाखल होतील. यानंतर तब्बल एक महिन्यानंतर उभय संघात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान, विंडीज खेळाडू दाखल झाल्यानंतर क्वारंटाईन होणार असून यानंतर ते  सुरक्षितेतची सर्व खबरदारी घेत सरावाला सुरुवात करणार आहेत. खेळाडू आणि सामन्यांचे आयोजन करण्यासाठी प्रत्येकाची संबधित प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. विंडीज संघ दाखल झाल्यानंतर क्वारंटाईनपासून त्यांची सर्व काळजी घेणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या एक सदस्याने सांगितले. या कसोटी मालिकेसाठी एकाही चाहत्याला प्रवेश दिला जाणार नसल्याने सुरक्षित वातावरणात हे सामने होतील.

Related Stories

आशिया चषक ठरणार वर्ल्डकपची रंगीत तालीम!

Patil_p

दबंग दिल्ली, बेंगळूर बुल्स, बंगाल वॉरियर्सचे विजय

Patil_p

निर्णायक कसोटीत यजमान इंग्लंडची खराब सुरुवात

Patil_p

स्वीडनचा इब्राहिमोव्हिक युरो स्पर्धेतून बाहेर

Patil_p

आशियाई नेमबाजीत भारताला आणखी 4 सुवर्ण

Amit Kulkarni

लांब उडीमध्ये उत्तरप्रदेशच्या शैली सिंगला सुवर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!