Tarun Bharat

इंग्लंड दौऱयासाठी विंडीज खेळाडूंवर सक्ती नाही : ग्रेव्ह

Advertisements

बार्बाडोस : इंग्लंडच्या आगामी क्रिकेट दौऱयासाठी विंडीजच्या खेळाडूंवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही, असे प्रतिपादन विंडीज क्रिकेट मंडळाचे प्रमुख कार्यकारी जॉनी ग्रेव्ह यांनी केले आहे.

कोरोना संकटामुळे विंडीज संघाचा हा इंग्लंड दौरा जुलै महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. या दौऱयामध्ये उभय संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य

इंग्लंड-विंडीज यांच्यातील ही आगामी कसोटी मालिका खेळविली जावी, असे विंडीजला वाटते. पण, कोरोना परिस्थितीचा आढावा आणि खेळाडूंच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य आम्ही देत आहोत, असेही ग्रेव्ह यांनी यांनी सांगितले.

खेळाडूंवर दडपण नसेल

या दौऱयासाठी विंडीजच्या क्रिकेटपटूंवर आम्ही कोणतेच दडपण आणणार नाही. स्वखुशीने विंडीज क्रिकेटपटूंनी या दौऱयासाठी होकार दिला तरच त्यांची निवड केली जाईल. ब्रिटनमध्ये सध्या कोव्हिड-19 प्रसार जलद आहे. आतापर्यंत इंग्लंडमध्ये कोरोना संकटातील बळींची संख्या 30,000 पर्यंत पोहचली आहे

Related Stories

14 महिन्यानंतर थिएमचा पहिला विजय

Patil_p

पाकची झिम्बाब्वेवर 6 गडय़ांनी मात

Patil_p

सायबर हल्ल्याने मँचेस्टर युनायटेडला धक्का

Patil_p

भारतीय बुद्धिबळपटूला मेलबर्न विमानतळावर रोखले

Patil_p

डल्लास टेनिस स्पर्धेत ओपेल्का अजिंक्य

Patil_p

लिव्हरपूलकडून प्रिमियर लिगचा विजयाने समारोप

Patil_p
error: Content is protected !!