Tarun Bharat

इंग्लंड फुटबॉल संघाला पराभवाचा धक्का

Advertisements

वृत्तसंस्था/ पॅरिस

नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात गॅरेथ साऊथगेट यांच्या इंग्लंड संघाला डेन्मार्ककडून हार पत्करावी लागली. या पराभवामुळे सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याच्या इंग्लंडच्या वाटचालीला फार मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात डेन्मार्कने इंग्लंडचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

गेल्या वषी झालेल्या पहिल्याच नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. पण आता यावषी त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याच्या वाटचालीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या स्पर्धेत गुणतक्त्यात बेल्जियमचा संघ इंग्लंडपेक्षा दोन गुणांनी आघाडीवर आहे. बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या अन्य एका सामन्यात बेल्जियमने आईसलँडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून पूर्ण गुण वसूल केले. बेल्जियमतर्फे लुकाकूने हे दोन्ही गोल नोंदविले. आता 15 नोव्हेंबरला बेल्जियम आणि इंग्लंड यांच्यातील सामना बुसेल्स येथे खेळविला जाणार आहे.

झाग्रेब येथे झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पॅरिस सेंट जर्मन संघातील प्रमुख स्ट्रायकर एम्बापेने निर्णायक गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयात आपला हातभार लावला. या सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. फ्रान्सतर्फे अँटोनी ग्रिझमनने पहिला गोल नोंदविला. तर एम्बापेने दुसरा आणि निर्णायक गोल केला. सामन्याच्या उत्तरार्धात क्रोएशियाचा एकमेव गोल व्हॅलेसिकने केला. या सामन्यात एम्बापेने पहिल्या दहा मिनिटात गोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फटका गोलपोस्टच्या वरून गेल्याने फ्रान्सला आपले खाते उघडता आले नव्हते. या सामन्यावेळी सुमारे 7 हजार शौकिन उपस्थित होते. फ्रान्सने आतापर्यंत एकदाही क्रोएशियाकडून हार पत्करलेली नाही. नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात गट 3 मध्ये फ्रान्स आणि पोर्तुगाल हे समान प्रत्येकी दहा गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. गेल्या वषी या स्पर्धेत पोर्तुगालने विजेतेपद मिळविले होते. लिस्बन येथे झालेल्या एका सामन्यात ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या गैरहजेरीत पोर्तुगालने स्वीडनवर 3-0 अशी एकतर्फी मात केली. कोरोनाची बाधा झाल्याने रोनाल्डो गेल्या काही दिवसांपासून फुटबॉलपासून अलिप्त आहे. इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील लढतीत 35 व्या मिनिटाला ख्रिस्टेन एरिक्सनने डेन्मार्कचे खाते उघडले. सामन्याच्या पूर्वार्धात इंग्लंड संघातील मॅग्गेरी याला पंचांनी दोन वेळा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. या सामन्यात इंग्लंड संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. पोलंड संघाने बोस्नियाचा 3-0 असा पराभव केला. अ गटातील हा सामना एकतर्फी झाला. पोलंडतर्फे लिवेनडोवेस्कीने 2 तर लिनेटिने 1 गोल केला. या गटात आता पोलंड पहिल्या स्थानावर असून इटली दुसऱया आणि हॉलंड तिसऱया स्थानावर आहे. इटली आणि हॉलंड यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. स्कॉटलंडने झेक प्रजासत्ताकचा 1-0 असा पराभव केला.

Related Stories

इंग्लंडचा लंकेवर मालिकाविजय

Patil_p

लंडन मॅरेथॉनमध्ये किटाटा, कोसगेई विजेते

Patil_p

नॉर्वेचा रुड उपांत्य फेरीत

Patil_p

स्पेनची गार्बिन मुगुरूझा विजेती

Patil_p

सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; गांगुली म्हणाले…

Tousif Mujawar

केसमानोव्हिक, सेरुन्डोलो शेवटच्या आठ खेळाडूंत

Patil_p
error: Content is protected !!