Tarun Bharat

इंग्लंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

3 सामन्यांची विस्डेन चषक मालिका  117 दिवसांच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा,

लाळबंदीमुळे गोलंदाजांसमोर खरे आव्हान

वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन

कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे पूर्णपणे ठप्प झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट आजपासून (दि. 8) यजमान इंग्लंड-विंडीज यांच्यात खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्याच्या माध्यमातून नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. उभय संघातील 3 कसोटी सामन्यांची मालिका क्रिकेट जगतासाठी विशेष महत्त्वाची असून यानंतर उर्वरित दोन सामने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रफोर्ड स्टेडियमवर होतील. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल.

इंग्लंडचा हंगामी कर्णधार बेन स्टोक्स व विंडीज कर्णधार जेसॉन होल्डर आपल्या संघाची रुपरेषा घेऊन नाणेफेकीसाठी मैदानात येतील, त्या क्षणाची अवघ्या क्रिकेट वर्तुळाला प्रतीक्षा असेल. या मालिकेत चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे, थेट प्रक्षेपण हे एकमेव माध्यम असेल. चाहत्यांची गैरहजेरी, चेंडूवर लाळ लावण्याची बंदी व मर्यादित जल्लोष ही कोव्हिडö19 नंतरच्या क्रिकेटवरील नवी बंधने असणार आहेत.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आयसीसीने लाळबंदीचा नियम अंमलात आणला आहे. सातत्याने लाळ लावली जात असेल तर पंच संबंधित संघाला समज देऊ शकतात, असे आयसीसीने पत्रकातून नमूद केले आहे. गोलंदाज व क्षेत्ररक्षक चेंडू आपल्या ड्रेसवर घासून चकाकी आणण्याचा प्रयत्न करु शकतील. पण, लाळबंदीची सवय त्यांना करुन घ्यावीच लागणार आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन व विंडीजचा केमर रोश हे स्टार जलद गोलंदाज या नव्या नियमाचा स्वीकार करत चेंडूला स्विंग आणण्यात कितपत यशस्वी ठरतील, हे पाहणे येथे औत्सुक्याचे ठरणार आहे. लाळेशिवाय चेंडू स्विंग करु शकणारा अँडरसन हा पहिला गोलंदाज ठरेल, असे अलीकडेच माँटी पनेसरने म्हटले होते, ते येथे उल्लेखनीय आहे.

इंग्लंडची धुरा बेन स्टोक्सकडे

दुसऱया अपत्याच्या प्रतीक्षेतील जो रुट येथील पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या गैरहजेरीत इंग्लिश संघाच्या नेतृत्वाची धुरा बेन स्टोक्सकडे असेल. स्टोक्सने कसोटीत एकदाही संघाचे नेतृत्व साकारलेले नाही आणि कारकिर्दीत प्रथमच त्याला ही संधी येथे लाभत आहे.

बंदिस्त स्टेडियम, चाहत्यांना प्रवेश नाही
आणि हाय-फाईव्हही नाही! चाहत्यांशिवाय क्रिकेट सामने, ही कल्पना देखील यापूर्वी कोणी मान्य केली नसती. पण, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे हे चित्रही आज प्रत्यक्षात येणार आहे. खेळाडू, पंच व रेफ्री आज मैदानात असतील. पण, खेळाचा श्वास म्हणून ओळखले जाणारे चाहते मात्र स्टॅण्ड्समध्ये असणार नाहीत. येथे खेळाडूंवर बळी मिळवल्यानंतर तसेच फलंदाजाने एखादा माईलस्टोन गाठल्यानंतर सहकाऱयांना आलिंगन देता येणार नाही, त्याचप्रमाणे हाय-फाईव्ह थाटात जल्लोषही साजरा करता येणार नाही. यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात स्टोक्स, बटलर, अँडरसन यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्याचा आनंद ढोपराला ढोपर भिडवत व्यक्त केल्याचे दिसून आले. तीच मालिका यापुढेही कायम राहू शकेल.

Related Stories

मीराबाईच्या मदतीसाठी मोदींची मध्यस्थी

datta jadhav

सूर्य शेखर गांगुलीला जेतेपद

Patil_p

भारत-इंग्लंड यांच्यात आज ‘व्हर्च्युअल फायनल’

Patil_p

कसोटी मानांकनात रोहित शर्मा नवव्या स्थानी

Patil_p

मनू-सौरभ यांना विश्व चषक नेमबाजीत रौप्यपदक

Patil_p

निम्मी आयपीएल संपली, गुणतालिकेत चेन्नईचा जलवा

Patil_p
error: Content is protected !!