Tarun Bharat

इंग्लंड 4 बाद 192

Advertisements

पोर्ट एलिझाबेथ / वृत्तसंस्था

झॅक क्रॉली (66) व डॉम सिबली (44) यांनी 107 धावांची शतकी भागीदारी साकारल्यानंतरही इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर 4 बाद 192 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. जो डेनली (27) व अष्टपैलू बेन स्टोक्स (2) स्वस्तात बाद झाले. शुक्रवारी सामन्याच्या दिवसअखेर जो रुट 41 चेंडूत 25 तर ऑलिए पोप 37 चेंडूत 22 धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे व्हरनॉन फिलँडर, हेन्ड्रिक्स, नोर्त्झे, पॅटरसन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे दिवसभरात केवळ 54.2 षटकांचा खेळ होऊ शकला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव : 54.2 षटकात 4 बाद 192 (झॅक क्रॉली 112 चेंडूत 11 चौकारांसह 66, डॉम सिबली 93 चेंडूत 7 चौकारांसह 44, जो डेन्ली 35 चेंडूत 4 चौकारांसह 27, जो रुट नाबाद 25, पोप नाबाद 22. अवांतर 6. फिलँडर, हेंड्रिक्स, नोर्त्झे, पॅटरसन प्रत्येकी 1 बळी).

 

Related Stories

दुसऱया सामन्यात विंडीजची भारतावर मात

Patil_p

कसोटीत ऑस्ट्रेलिया, टी-20 मध्ये भारत अग्रस्थानी

Patil_p

विराटची पहिली ऑडी पोलीस स्टेशनमध्ये का?

Patil_p

‘तो’ हेलिकॉप्टर अपघात कोबे ब्रायंटच्या हट्टामुळेच!

Patil_p

प्राग्वे टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

सन्नाटा आणि दिलासा…

Patil_p
error: Content is protected !!