Tarun Bharat

इंग्लिश पथकातील 7 सदस्यांना कोरोना

Advertisements

लंडन / वृत्तसंस्था

यजमान इंग्लंडच्या पथकातील 3 खेळाडू व 4 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली असून यामुळे इंग्लंडवर पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी पूर्ण नवा संघ निवडण्याची नामुष्की आली. प्रारंभी निवडले गेलेले सर्व खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले असून सोमवारी घेतल्या गेलेल्या चाचणीत 7 सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले.

कोरोनाची बाधा झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केलेली नसून उर्वरित सर्व खेळाडूंच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाचे बारीक लक्ष आहे. दरम्यान, पथकातील 7 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही यामुळे पाकिस्तानविरुद्ध मालिकेत व्यत्यय येणार नाही, असे इंग्लिश व्यवस्थापनाने स्पष्ट केले. इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून या मालिकेची सुरुवात गुरुवारी कार्डिफ येथे होणाऱया पहिल्या वनडेने होईल.

बेन स्टोक्सकडे नेतृत्व

पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी सर्व चेहरामोहरा बदलत इंग्लिश व्यवस्थापनाने नेतृत्वाची धुरा अनुभवी बेन स्टोक्सकडे सोपवली आहे. ख्रिस सिल्वरहूड यांचे या संघाला प्रशिक्षण लाभेल. वनडे मालिका झाल्यानंतर 16 जुलैपासून होणाऱया टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचा आधी निवडलेला संघ खेळेल.

इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूने किमान एक लस घेतली आहे. मात्र, प्रत्येकाचे पूर्ण लसीकरण झालेले नाही. ज्यांना कोरोनाची बाधा झाली, त्यातील बहुतांशी जणांना लक्षणे दिसून आलेली नाहीत. डेल्टा व्हेरिएन्टमुळे आम्ही अधिक सतर्क आहोत, असे ईसीबीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी टॉम हॅरिसन यांनी म्हटले आहे.

आगामी मालिकेसाठी एकूण प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के तिकिटांची विक्री केली जाणार असल्याचे ईसीबीने येथे नमूद केले. त्यानंतर लॉर्ड्सवरील लढतीला 100 टक्के प्रवेश दिला जाणार आहे. एजबॅस्टन येथे या मालिकेची सांगता होणार आहे.

सुधारित इंग्लिश संघ ः बेन स्टोक्स (कर्णधार), जेक बॉल, डॅनी ब्रिग्ज, ब्रायडन कार्स, झॅक क्राऊली, बेन डकेट, लुईस गेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, सकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स व्हिन्स.

Related Stories

माजी मल्ल गॅस्पार्ड मृतावस्थेत

Patil_p

धवन सेनेचे लक्ष मालिका विजयावर

Patil_p

रशियाची कॅसात्किना विजेती

Patil_p

प्रो कबड्डी लीगमध्ये आज रंगणार उपांत्य सामने

Patil_p

ब्रायन लारा म्हणतो जबाबदारीने खेळला तर ऋषभ पंतच सर्वोत्तम यष्टीरक्षक!

Omkar B

लंका-पाक कसोटी मालिका बरोबरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!