Tarun Bharat

इंग्लिश प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूडना डच्चू

Advertisements

लंडन / वृत्तसंस्था

इंग्लिश क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांना प्रशिक्षकपदावरुन डच्चू देत असल्याची ईसीबीने घोषणा केली. इंग्लंडचा संघ विंडीज दौऱयावर जाणार असून त्यावेळी अंतरिम प्रशिक्षक नेमण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे ईसीबीने येथे नमूद केले. ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन यांनी विंडीज दौऱयासाठी माजी इंग्लिश कर्णधार ऍन्ड्रय़ू स्ट्रॉस हे काळजीवाहू प्रशिक्षक असतील, असे यापूर्वी म्हटले आहे. दरम्यान, पदच्यूत प्रशिक्षक सिल्वरवूड यांनी खेळाडू, सहायक पथकासह व्यवस्थापनाचे आभार मानले. ‘मागील दोन वर्षे बरीच आव्हानात्मक होती. पण, मी या कालावधीत माझी जबाबदारी पार पाडण्याचा पूर्ण आनंद घेतला’, असे ते म्हणाले.

Related Stories

इंग्लंड दौऱयासाठी विंडीज खेळाडूंवर सक्ती नाही : ग्रेव्ह

Patil_p

ओपेल्काचा मेदवेदेवला धक्का, शॅपोव्हॅलोव्हची आगेकूच

Patil_p

भारताचे पात्र फेरीचे फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

कसोटी मानांकनातील कोहलीचे अग्रस्थान कायम

Patil_p

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील 55 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

उत्तेजक प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनद्वारे

Patil_p
error: Content is protected !!