Tarun Bharat

इंजिनियर मारहाण प्रकरण: ‘CCTV फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे.

हे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करावेत असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. स्थापत्य अभियंता अनंत करमुसे याने या प्रकरणामध्ये उच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे) द्यावा अशी मागणी या करमुसे याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी यांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Related Stories

संचारबंदी : बाहेर फिरणा-या नागरीकांच्या कपाळी वारकरी ‘बुक्का’

Archana Banage

शंभर वर्षातील गडद संकट

Patil_p

उमा खापरे पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या महिला आमदार होणार

datta jadhav

कोरेगाव शहरात दोन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा

Patil_p

सरकारच्या अहंकाराचं हरण या निवडणुकीत होईल-सुधीर मुनगंटीवार

Abhijeet Khandekar

आमदारांना मोफत घरं मिळणार नाहीत

datta jadhav