Tarun Bharat

इंटरनेट विश्वाचा वेध…!

हे ’इंटरनेट‘ म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाद्वारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा ’नेट‘ तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की  इंटरनेट होते .

जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या प्रसारामुळे ही शक्मयता आता दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत एका देशातील बुध्दीमत्ता तेथील इतर परिस्थिती योग्य नसल्याने त्या देशास वापरता येत नव्हती. त्यामुळे बुध्दीमान लोक प्रगत राष्ट्रात जाऊन बुध्दीमत्तेच्या साठय़ास गळती लागून (ब्रेन ड्रोन) प्रगतशील राष्ट्रांना नव्या धोक्मयाला सामोरे जावे लागत होते.

इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तींना आता प्रगत राष्ट्रांत न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्मय झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापारपेठ इंटरनेटमुळे खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्मयता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्मयात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्ज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्कील गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (ब्राऊझर) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो.

टेलनेट नावाचा
प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱया नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते. सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.

बी.बी.एस. (बुलेटीन बोर्ड सिस्टीम) कंपन्या माहिती साठवून ठेवणे व वितरीत करणे या पध्दतीने काम करतात. या ठिकाणी आपण केव्हाही माहिती पाठवू शकतो. घेणाऱयाचा संगणक चालू नसला तरी अशा कंपन्यांच्या साहाय्याने ही माहिती पाठविता येते. वर्ल्ड वाइड वेब या सर्वांना वाचता येऊ शकेल असे पान (साईट) अनेक कारणांसाठी कंपन्या तयार करतात. त्यांना एक विशिष्ट संकेतक्रमांक मिळतो. यालाच संकेतस्थळाच्या नावाने ओळखता येते. छोटय़ा कंपन्या अशा पानाचा छोटा हिस्साही आरक्षित करू शकतात. या पानावर वर्णनात्मक वा चित्रमय माहिती असते. वर्णनात्मक माहितीतून आवश्यक ते शब्द पकडून वाचकास त्या शब्दाच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकते. अशा वर्णनाला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) असे म्हणतात.

गोफर या नावाच्या प्रोग्रॅममध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्मयामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते. इंटरनेटवर वेगवेगळया प्रकारचे संगणक जोडले जाण्याची किमया व त्यात संपर्क साधण्याची शक्मयता टी.सी.पी./आय.पी. (ट्नन्स्मिशन कंट्नेल प्रोटोकोल/इंटरनेट प्रोटोकोल) या नियम प्रणालींचा वापर केल्याने प्रत्यक्षात आली आहे. इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वापर अधिक सुलभ व प्रभावीपणे करता येणार आहे.

इ मेल हा इंटरनेटचा प्राथमिक उद्देश वाटला तरी प्रत्यक्षात वापर करमणुकीसाठी खेळ, चित्रपट, संगीत यांच्या आदान प्रदानासाठी होत आहे. इंटरनेटचा शिक्षणासाठी उपयोग हा आपल्या भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रांना एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विविध क्षेत्रात होणारे संशोधन येथील संशोधनाला अधिक प्रेरणा देऊ शकेल. आरोग्याच्या क्षेत्रातही इंटरनेटचा वापर भविष्यकाळात फार प्रभावीपणे होऊ शकेल.

Related Stories

आत्मविश्वास, जगण्याची उमेद

Patil_p

क्रेझ कॅम्पस इंटरव्हय़ूची

Patil_p

आरंभ प्रवेश पर्वाचा

tarunbharat

सण येता गोडव्याचा

Patil_p

अमेरिकेत वर्णद्वेशातून उफाळला असंतोष

Patil_p

ऊर्जा सकारात्मकतेचा

tarunbharat
error: Content is protected !!